विना नंबरच्या गाडीने सोलापुरात येणाऱ्या असद्दुदीन ओवेसींना पोलिसांनी ठोठावला २०० रुपयांचा दंड; आयुक्तांनी अधिकाऱ्याला दिलं ५ हजारांचं बक्षीस

police commissioner reward traffic police officer

police commissioner reward traffic police officer
असद्दुदीन ओवेसी सोलापुरात विना नंबरच्या गाडीने दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गाडी ओवीसी यांच्या नावावर नसून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती
  • सीएमव्हीआर कलम ५०/१७७ कायद्या अन्वये कारवाई करण्यात आली
  • शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही जहरी टीका

police commissioner reward traffic police officer : सोलापूर : मंगळवारी एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. मात्र, असद्दुदीन ओवेसी ज्या गाडीमध्ये आले त्या लॅन्डरोव्हर गाडीला समोरील बाजूला नंबरप्लेट लावलेली नव्हती. परंतु मागील बाजूला नंबरप्लेट लावलेली होती. गाडीला समोरील बाजूला नंबर प्लेट लावली नसल्याने तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे, कोणीही असो कायदा सर्वाना समान आहे याची जाणीव करून देणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सोलापूर आयुक्तांनी पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे.

गाडी ओवीसी यांच्या नावावर नसून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती

मात्र गाडी ओवीसी यांच्या नावावर नसून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती. ज्याच्या नावावर गाडी होती त्या व्यक्तीवरोधात पोलिसांनी कारवाई केली. आणि २०० रुपयांचा दंड वसूल केला. सोलापूर दौऱ्यावर असणारे असद्दुदीन ओवेसी शासकीय विश्रामधाम येथे लॅन्डरोव्हर या गाडीने आले होते. या गाडीला पुढील बाजूला नंबरप्लेट नव्हती. मात्र , यावर तेथे उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची नजर यावर पडली आणि त्यांनी तत्काळ गाडीच्या ड्रायव्हरला  वाहनाला नंबरप्लेट लावण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी चालकाने तत्काळ समोरील बाजूस नंबरप्लेट लावून घेतली.

ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्यांना पोलीस आयुक्तांनी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही कामगिरी पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि चिंतांकिदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणे केली. त्यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांनी चिंताकिंदी यांना रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करुन गौरव केला आहे.

सीएमव्हीआर कलम ५०/१७७ कायद्या अन्वये कारवाई करण्यात आली

एमआयएमचे सर्वेसर्वा असद्दुदीन ओवेसी हे ज्या गाडीत आले त्या लॅन्डरोव्हर, त्या गाडीचा  क्रमांक टीएस - ११ / ईव्ही - ९९२२ असा असून, या वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नसल्याने सदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम ५०/१७७ अन्वये कारवाई करण्यात आली. या वाहनचालकाकडून पोलीस अधिकाऱ्यानं २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही जहरी टीका

दरम्यान, असुदुद्दीन ओवेसी यांनी सदर रॅलीला संबोधित करताना शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही जहरी टीका केली. मंगळवारी दुपारी असद्दुदीन ओवेसी यांचं सोलापुरात आगमन झालं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी