Shocking! पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, समोर आलं धक्कादायक वास्तव

Solapur, malasiras murder case : नातेवाईकांनी पळ काढल्याने पोलिसांना नंतर अधिकच संशय आला आणि त्यांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला असून, सदर प्रकरणात महिलेची हत्या झाल्याचं समोर आल आहे

Solapur malasiras murder case Police extinguished the burning body and sent the body for autopsy
पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला
  • पल्लवी आणि आरोपी पती मनोज राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबीक वाद होता
  • आरोपीनं पल्लवी यांना किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली. यामध्ये पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला

सोलापूर : एका स्मशानभूमीत विवाहित महिलेवर अंत्यसंस्कार (Funeral) सुरू असताना अचानक पोलीस आले आणि नातेवाईकांनी जळती चिता सोडून घटना स्थळावरून पळ काढला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) याठिकाणी घडला असून, मृत महिलेची हत्या केल्यानंतर तिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचून नातेवाईकांनी रचला होता. पण चौकशीसाठी पोलीस स्मशानभूमीत येताचं आरोपी नातेवाईकांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला 

दरम्यान , नातेवाईकांनी पळ काढल्याने पोलिसांना नंतर अधिकच संशय आला आणि त्यांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला असून, सदर प्रकरणात महिलेची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. पल्लवी मनोज राऊत असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव असून पल्लवीच्या हत्येप्रकरणी पोलीसांनी चार आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चारही जणांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अशी आहेत आरोपींची नावे

पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत, मृताची आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम गवळी असं न्यायालयीन कोठडी मिळालेल्या चार आरोपींची नावं आहेत.

पल्लवी आणि आरोपी पती मनोज राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबीक वाद होता

 समोर आलेल्या माहितीनुसार , मागील दीड वर्षात त्यांच्या दोघांत अनेकदा कडाक्याची भांडणं झाली आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी मृत पत्नी पल्लवी आणि आरोपी पती मनोज राऊत यांच्यात मागील काही कौटुंबीक वाद सुरू होता. त्याचबरोबर आरोपी पतीनं मृत पल्लवी यांना अनेकदा बेदम मारहाण देखील केली आहे.

आरोपीनं पल्लवी यांना किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली. यामध्ये पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला 

सततच्या भांडणांमुळे पल्लवीला त्रास सहन होत नव्हता. त्यामुळे त्या घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. मात्र, पल्लवी यांचा शोध लागल्यानंतर त्यांना सासरच्या मंडळींनी घरी आणलं. घरी आणल्यानंतर ही वाद मात्र थांबला नाही आणि किरकोळ वादातून पल्लवी यांना घरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली यातून पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घराच्या मंडळींनी पल्लवी ची हत्या लपवण्यासाठी आत्महत्या तिने स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव केला.

कोणालाही न सांगता पल्लवीचा अंत्यसंस्कार देखील उरकण्याच्या प्रयत्नात होते.

पतीच्या सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून अलीकडेच पल्लवी यांनी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. काही दिवसांनी पल्लवीचा थांगपत्ता लागल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला परत आणलं होतं. परत आणल्यानंतरही त्यांच्यातील कलह कमी झाला नाही. यातून संशयित आरोपीनं पल्लवी यांना किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली. यामध्ये पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणि कोणालाही न सांगता तिचे अंत्यसंस्कार देखील उरकण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ऐनवेळी पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जळत्या चितेवरून पल्लवीला काढून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि तिची हत्या झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी