Robbery in Solapur district सोलापूर जिल्ह्यात जबरी दरोडा, अंगठी द्यायला नकार दिल्याने बोट कापू लागले दरोडेखोर

Robbery in Solapur district : माढा तालुक्यात एक मोठी जबरी चोरीची घटना घडली आहे. माढ्याच्या वडशिंगे या गावात ६ जणांनी लोखंडी पाईप दांडक्याने केली तिघांना मारहाण करत , २ लाख ८ हजार ५०० चा ऐवज लुटला

Robbery in Solapur district
अंगठी द्यायला नकार दिल्याने बोट ही कापू लागले दरोडेखोर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पहाटे  एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दरोडा पडला
  • छोटा मुलगा हर्ष ला लाकडाने मारहाण करताच तो मोठ मोठ्याने रडु लागल्याने त्याला मारणे बंद केले
  • एकुण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला

Robbery in Solapur district सोलापूर – माढा तालुक्यात एक मोठी जबरी चोरीची घटना घडली आहे. माढ्याच्या वडशिंगे या गावात ६ जणांनी लोखंडी पाईप दांडक्याने केली तिघांना मारहाण करत , २ लाख ८ हजार ५०० चा ऐवज लुटला , दरम्यान, ग्रामुसरक्षा दलामुळे अन्य चोऱ्या टळल्या आहेत. पत्नीने पत्नीला दिवाळीचे गिफ्ट आणलेले २ तोळ्याचे गंठण देखील चोरांनी पळवले आहे. चोरी करत असताना चोरांनी अंगठ्या देखील मागितल्या मात्र, अंगठी द्यायला नकार दिल्याने बोट ही कापु लागले असल्याची माहिती समोर आली आहे.

पहाटे  एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दरोडा पडला

माढा तालुक्यातील गावात स्टॅम्प व्हेंडर सुरेश कदम यांच्या घरावर जबरी दरोडा पडला आहे. ६ नोव्हेंबरच्या (शनिवार) पहाटे एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दरोडा पडला असून ६ दरोडेखोरांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने केलेल्या  मारहाणीत  सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली , मुलगा रितेश जखमी झाले. या दरोड्यात रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. तर वैशाली यांना दिवाळी निमित्त गंठण आणले होते. ते देखील चोरट्यांनी लांबवले. वैशाली यांच्या बोटातील अंगठ्या देण्यास मज्जाव करताच त्यांची बोटे कापा दरोडेखोर म्हणताच वैशाली यांनी बोट नका माझं कापु असं म्हटलं आणि दोन अंगठ्या त्यांनी दरोडेखोरांना काढुन दिल्या.

छोटा मुलगा हर्ष ला लाकडाने मारहाण करताच तो मोठ मोठ्याने रडु लागल्याने त्याला मारणे बंद केले

दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत सुरेश कदम  वैशाली कदम यांना गंभीर दुखापत झाली आहे.तर मोठा  मुलगा रितेश ला देखील लाकडाने मारहाण केलीय. तर छोटा मुलगा हर्ष ला लाकडाने मारहाण करताच तो मोठ मोठ्याने रडु लागल्याने त्याला मारणे बंद केले. माढ्यातील पाटील हॉस्पिटल मध्ये तिघांवर उपचार सुरु आहेत. वडशिंगे गावातील संदीप पाटील यांना कदम यांच्या घरी दरोडा घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने ग्रामसुरक्षा यंत्रणेला फोन केला. आणी गावकरी सावध झाले. यामुळे गावात इतर ठिकाणी पडणाऱ्या दरोड्या च्या घटना टळल्या गेल्या. 

एकुण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला

रोख नव्वद हजार रुपये रक्कम , कदम यांनी पत्नीला दिवाळी निमित्त आणलेले ८०  हजार रुपयांचे सोन्याचे गंठण,१६  हजार रुपयांच्या दोन अंगठ्या,वीस हजार रुपयांचे फुले - झुबे, दोन हजार रुपयांचे पैंजण, पाचशे रुपयांचे जोडवे असा एकुण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला. त्याचबरोबर चोरटे २५ ते ३० वयोगटातील होते. ते मराठी भाषेचा वापर करत असून सडपातळ होते. ते मराठीत भाषेत बोलत होते. चोरी करण्या पुर्वी त्यांनी जबर मारहाण केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी