'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार'

'आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार.' असं मत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव व्यक्त केलं आहे.

shiv sena chief uddhav thackeray and his family will be supported said  former shiv sena district chief said solapur
'उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार'  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • 'शिवसैनिकांना संघर्षाचा वारसा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे.'
  • शिवसेनेने सोलापुरात बैठक घेऊन शिंदे गटाला दिले प्रत्युत्तर
  • शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव उद्धव ठाकरेंच्याच पाठिशी

सोलापूर: 'कोणीही कुठेही गेले तरी सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार आहे.' असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे समर्थक गटाने पंढरपुरात रविवारी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेने रविवारी सोलापुरात बैठक घेऊन शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीच्या वेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.

अधिक वाचा: सर्वोच्च न्यायालयातील १६ आमदारांविषयीची सुनावणी लांबणीवर?

अभंगराव म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अनेक संकटे आली परंतु अशा संकटांना भीक न घालता ते जोमाने उभे राहिले आणि शिवसेनेचा विस्तार केला. शिवसैनिकांना हाच संघर्षाचा वारसा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी एकत्र येऊन तालुक्या तालुक्यातून मिळावे आंदोलने, मोर्चे, बैठका घेऊन जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करतील आणि शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेईल. असे साईनाथ अभंगराव यावेळी म्हणाले.

अधिक वाचा: भरत गोगावलेंच्या गाडीचा अपघात, आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या

माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे म्हणाले, 'फितूर शिवसेनेतून गेले तरी शिवसेना संपणार नाही. शिवसैनिकांची निष्ठा प्रामाणिक आहे. शिवसेना संपवण्याची ताकद बंडखोरांमध्ये नाही. शिवसेनेच्या आमदारांची कामे भाजपसोबत सत्तेत असतानाही होत नव्हतीच. मग तेव्हा का सरकार पाडले नाही? फक्त सत्तेसाठी हे बंडखोर भाजप सोबत गेले हे यातून सिद्ध झाले असेही माजी मंत्री श्री. खंदारे यावेळी म्हणाले. 

याप्रसंगी पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. 

मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं?

दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पाहा त्या बैठकीत नेमकं काय घडलं. 

शिवसेनेच्या सर्वच खासदारांचा आजच्या बैठकीत असा सूर होता की, आपण एकनाथ शिंदे आणि भाजपशी जुळवून घेतलं पाहिजे. कारण भाजपने देशात मोठी ताकद निर्माण केली आहे. आपल्याला आपला पक्ष भविष्यात वाढवायचा असेल तर आपल्याला या ताकदीसोबत पुढे जायला पाहिजे.

अधिक वाचा: खासदारांची 'मातोश्री'वर बैठक; 18 खासदारांपैकी ६ अनुपस्थित

एकनाथ शिंदे फुटून बाजूला गेले असले तरी आजही मनाने शिवसैनिक आहेत. शिवसेनेची विचारधारा घेऊन पुढे गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंशी जुळवून घेतलं तर पक्षासाठी हिताचं होईल. 

यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर एक प्रकारे दबाव वाढत आहे. दुसरीकडे खासदारांनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण की, एनडीएच्या बाजून सर्व खासदार तयार असताना संजय राऊत यांनी मात्र या बैठकीत अशी मागणी केली आहे की, आपण महाविकास आघाडीसोबत होतो. यामुळे यशवंत सिन्हा हे आपले उमेदवार असू शकतात. आपण त्यांना मतदान केलं पाहिजे. पण या गोष्टीला सर्व खासदारांनी विरोध केला. 

खासदारांनी आपलं मत भाजपसोबत जावं असं थेट उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. जर तसं झालं नाही तर हे बारा आमदार फुटण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी