शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य म्हणाले मला निवडणुकीत भाजपची खूप साथ मिळाली, मंत्रीपद वाटप करत असताना 'अशी' तंबीही देण्यात आली होती

shivasena mla shahaji bapu patil shokking statement : या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही असे सांगताना घर की मुर्गी दाल बराबर आहे, कारण ३० वर्षे निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनाही मंत्रीपदापासून डावलल्याची खंत शहाजीबापू यांनी बोलून दाखवली आहे.

shivasena mla shahaji bapu patil shokking statement
मला निवडणुकीत भाजपची खूप साथ मिळाली - शिवसेना आमदार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली - पाटील
  • तालुक्यात मला शिवसेनेची केवळ ११०० मते मिळाली
  • या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही

सोलापूर : पंढरपूर  तालुक्यात मला शिवसेनेची केवळ ११०० मते मिळाली असून मला भाजपची मोठी मदत झाल्याने मी आमदार झालो असं वक्तव्य उघडपणे शिवसनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून, अनेक चर्चाना उधान आले आहे.

शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम – परंडा – वाशीचे आमदार तानाजी सावंत यानी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी  खळबळ उडाली होती. त्यातचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आमदारही (Shiv Sena MLA) समाधानी नाहीत याचं उदाहरण म्हणजे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या एका भाषणातून समोर आले. 

खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली

दरम्यान, पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर २४ तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे असे शहाजीबापू यांनी सांगितले. पंढरपूर येथील डॉ बी पी रोंगे हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. यावेळी, भाजप खासदार रणजित निंबाळकर , भाजप आमदार समाधान अवताडे , माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील उपस्थित होते. 

शिवसेनेकडून अशी तंबीही मिळाली होती?

या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही असे सांगताना घर की मुर्गी दाल बराबर आहे, कारण ३० वर्षे निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनाही मंत्रीपदापासून डावलल्याची खंत शहाजीबापू यांनी बोलून दाखवली आहे. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेकडून गप लांब बसायचं, गडबड करायची नाही अशी तंबीही मिळाली होती. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे गुपित शहाजीबापू यांनी उघड केले. करत स्वतःच्याच पक्षाला टोले देखील लगावले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी