पुन्हा शिवसेनेच्या एका आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सत्ता बदलाचे स्पष्ट दिले संकेत

shivsena mla tanaji sawant big statement :  रामदास कदम यांच्या पाठोपाठ शिवसेना आमदार तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

shivsena mla tanaji sawant big statement
पुन्हा शिवसेनेच्या एका आमदाराचे खळबळजनक वक्तव्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • येत्या तीन– चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलतील – आमदार सावंत
  • शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवसेना आमदारांमध्ये छुपी नाराजी
  • सतंच राजकारण होणार असेल तर मला त्यामध्ये रस नाही - आमदार सावंत

पंढरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी एक पत्रकार परिषद घेत पक्षातीलचं काही नेत्यावर टीका केली आहे. त्यामुळे, रामदास कदम हे काही दिवसताचं पक्षाला रामराम करू शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दरम्यान , रामदास कदम यांच्यानंतर पक्षातील दुसरे आमदार तानाजी सावंत हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहेत.

येत्या तीन– चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलतील – आमदार सावंत

तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम – परंडा –वाशीचे आमदार आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांनी एक इशारा दिला आहे की,  येत्या तीन– चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलणार आहेत. पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. काही मागायचे ते मागा असे सांगत त्यांनी सत्ता बदलाचे स्पष्ट संकेत दिले दिल्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आली आहे.

 

शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवसेना आमदारांमध्ये छुपी नाराजी

तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये मंत्री होते त्याचबरोबर ते उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेससोबत झालेल्या महाविकासआघाडी सरकारमुळे अनेकांना मंत्री पदापासून दूर राहावे लागले आहे. तानाजी सावंत यांचा देखील त्यावेळी पत्ता कट झाला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवसेना आमदारांमध्ये छुपी नाराजी असल्याचं दिसून येत होत. त्यातूनच आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले असावे असा अदांज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

तानाजी सावंत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

नुसतंच राजकारण होणार असेल तर मला त्यामध्ये रस नाही असं सावंत यांनी म्हटलं आहे. निवडणूक लढणे आणि जिंकून येणे हे मी दुय्यम समजतो.लोकांची गरिबी दूर झाली पाहिजे. ४० वर्षे आपल्याकडे कोणीही पाहिले नाही. यापद्धतीने तुमच्या सहकार्याची गरज आहे. येत्या २ – ४ महिन्यात दिवस बदलतील पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी