सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

सोलापूर
अजहर शेख
Updated Jul 12, 2020 | 10:06 IST

solapur corona patient found : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित्त रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महापालिका हद्दीसह ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या गावांमध्ये १६ जुलै पासून लॉकडाऊन करण्यात येणार

solapur corona patient found
सोलापुर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सोलापुर शहर-जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ३ हजार ९७७ झाली
  • सोलापुरात आतापर्यंत १५ हजार १७७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्या आहेत
  • जिल्ह्यातील ३३२ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला

सोलापूर: देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण (corona patient) पुन्हा मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने भीतीचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सोलापूर (solapur) जिल्ह्यात देखील कोरोनाचा विळखा वाढत असून ११ जुलै रोजी कोरोनाबाधित (corona positive) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. शनिवारी  (११ जुलै) रोजी वाढलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ८६ तर ग्रामीण भागातील १९७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान शहरात दोघांचा मृत्यू झाला आहे.

एवढे अहवाल प्रलंबित (solapur corona  test  pending )

दरम्यान सोलापूर शहरातील २३४ अहवाल प्रलंबित आहेत. तर ग्रामीण भागातील (solapur  rural area) देखील ५६ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने आणखी किती रुग्णांची भर पडणार आहे. याची चिंता मात्र प्रशासन आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पडली आहे.

या भागात आढळले कोरोनाबाधित रुग्ण

सेटलमेंट कॉलनी क्र. एक येथे (३), शहा नगर (लिमयेवाडी) (२), जोडभाव पेठेत (४), मल्लिकार्जुन नगरात (५), चिंता नगरात (निराळे वस्ती) (३), सेटलमेंट कॉलनी क्र. सहा, मल्लिकार्जुन नगर, जुनी मिल चाळ, लक्ष्मी पेठ, अभिषेक नगर, बनशंकरी नगर, सिध्देश्‍वर नगर (मजरेवाडी), वृदांवन सोसायटी, ओम नम: शिवाय नगर, गोंधळे वस्ती, रेल्वे लाईन, गिता नगर (न्यू पाच्छा पेठ), अभिषेक नगरात (६), उत्तर कसब्यात (२), होटगी रोडवर (२), न्यू पाच्छा पेठेत (३), बुधवार पेठेत (३), रामलाल नगरात (२), कुमठ्यात (४), लक्ष्मी नगर, राहूल नगर (हत्तुरे वस्ती) प्रत्येकी दोन, भवानी पेठ (मराठा वस्ती) येथे (४), कोंडा नगर (अक्‍कलकोट रोड) येथे (२), कलावती नगर, भूलक्ष्मी नगर (एमआयडीसी), आंबेडकर सोसायटी (कुमठा नाका), रविवार पेठ, अभिमान श्री कॉम्प्लेक्‍स, टिळक चौक, शेळगी, जवाहर सोसायटी, कुमठा नाका (स्वागत नगर), शिवाजी नगर (मोदी), बसवेश्‍वर नगर, आत्मविश्‍वास नगर, मंगळवार बाजार, एन जी मिल चाळ, आदर्श नगर, खडक गल्ली (बाळे), साईबाबा चौक, अवंती नगर आणि वरद फार्म 

सोलापुरातील बाधितांची संख्या ३ हजारावर

सोलापुरात कोरोनाने शिरकाव करून आज रविवारी ३ महिने पूर्ण होत आहेत. दरम्यान या तीन महिन्याच्या कालावधीत सोलापुरात कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. आतापर्यंत सोलापुर जिल्ह्यातील  कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९७७  इतकी झाली असून, जिल्ह्यातील ३३२ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या

सोलापुरात आतापर्यंत १५ हजार १७७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्या  असून, त्यामध्ये सध्यस्थितीत २३४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर आतापर्यंत १ हजार ७४९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर उपचार घेऊन मात केली आहे. तर सध्या १ हजार बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत.  दरम्यान शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रशासनाने अखेर दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महापालिका हद्दीसह ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार आहे.  १६ जुलै ते २६ जुलै पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी