सोलापुरात अग्नितांडव : भीषण आगीत अनेक यंत्रमाग कारखाने जळून खाक, पहा व्हिडीओ

Many handloom factories were gutted in the fierce fire ; स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात आग असल्याने ती आटोक्यात येत नव्हती. या आगीत अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलम नगर येथील दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखान्याने देखील जळून खाक झाले आहेत.

Many handloom factories were gutted in the fierce fire
सोलापुर भीषण आगीत अनेक यंत्रमाग कारखाने जळून खाक,पहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोलापूर जिल्ह्यात सुताच्या कारखान्याला लागली भीषण आग
  • दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखानाही जळून खाक
  • आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही

Handloom Fire : सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ( Solapur District ) सुताच्या कारखान्याला लागलेल्या आगीत अनेक सुताचे कारखाने जाळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये शनिवारी सायंकाळी सुमारास सदर घटना घडली आहे. अचानकपणे लागलेल्या या आगीत जवळपास 4 ते 5 कारखाने जळून खाक झाले आहेत. कारखान्यांना आग लागताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला फोन केला होता. अग्निशमन दल देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आगीवर पाण्याचा फवारा मारत होते. पण आगीन रौद्ररूप धारण केले असून आग नियंत्रणात येत नव्हती. अग्निशमन दलाने जवळपास १५ ते २० गाड्यांचा फवारा केला आहे. तरीदेखील आग आटोक्यात येत नव्हती. (solapur handloom factories caught fire video gone viral)

अधिक वाचा ; फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन

दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखानाही जळून खाक

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात आग असल्याने ती आटोक्यात येत नव्हती. या आगीत अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलम नगर येथील दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखान्याने देखील जळून खाक झाले आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागताच आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीचे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणत व्हायरल झाल्याने  परिसरातील अनेक नागरिक नीलम नगर परिसरातील एमआयडीसीकडे दाखल झाले होते.

अधिक वाचा ; सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे घरगुती उपाय 

आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही

दरम्यान, आग नेमकी का लागली? याचे नेमके कारण अद्याप देखील समोर आले नाही. मात्र, आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे सूत, कच्चा माल, पक्का माल जळून खाक झाला आहे. वसंत नेमचंद मुनोत एक्स्पोर्ट टॉवेल कारखान्याला आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दल अधिकारी केदार आवटे यांनी दिली.

अधिक वाचा ; अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस : Rajnath Singh

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी