सोलापूर : “सुप्रिया सुळे मला ओळखत नसतील, पण मी त्यांना ओळखतो,” असं सोलापूर जिल्ह्याचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जय सिद्धेश्वर स्वामी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा नेते सुभाष देशमुख देखील होते. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली. यानंतर आता खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी सदर प्रतिक्रिया दिली आहे.
अधिक वाचा : मित्र बनवण्यासाठी माहिर असतात या राशीतील लोक, वाचा सविस्तर
दरम्यान, पुढे बोलताना भाजपा खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले की, आमची दोन-तीन वेळा भेट झाली आहे. मात्र, सोलापूरमधील विकास कामांबाबत त्यांच्याशी कोणताही विचारविनिमय झालेला नाही. कारण आम्ही ज्यांच्याशी चर्चा करायची होती त्यांच्याशी संवाद साधत राहिलो. असंही खासदार खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर “खासदार सुप्रिया सुळे मला ओळखत नसतील, पण मी त्यांना ओळखतो. आता जर मी त्यांच्यासमोर उभा राहिलो तरीही त्या मला ओळखत नसतील तर मी काही बोलू शकत नाही. “आम्ही मंत्रिमंडळातील जोशी आणि इतर व्यक्तींशी संवाद साधत आलो. यासाठी सुप्रिया सुळे यांच्याशी माझं काहीही बोलणं झालेलं नाही,” असंही जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी माध्यमांसमोर बोलतना म्हटलं आहे.
अधिक वाचा ; जळगावात महिलेच्या पोटातून काढला साडे चार किलोचा ट्युमर