Viral Video : सोलापूर रेल्वेत चढताना प्रवाशाचा हात निसटला, रेल्वेखाली जाता जाता पोलिसांनी वाचविला जीव व्हिडीओ व्हायरल

Railway Viro viral सोलापुरात रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाच जीव वाचवला. एक प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचा हात निसटला. अशा वेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याचे प्राण वाचवले. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. 

solapur railway station
सोलापूर रेल्वे स्टेशन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोलापुरात रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाच जीव वाचवला.
  • एक प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचा हात निसटला.
  • अशा वेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याचे प्राण वाचवले.

Solapur Video Viral : सोलापूर : सोलापुरात रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाच जीव वाचवला. एक प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचा हात निसटला. अशा वेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याचे प्राण वाचवले. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. 

२६ एप्रिल रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी साडे अकराच्या सुमारास सोलापूरहून हैद्राबदाच्या दिशेने एक गाडी निघाली. तेव्हा एक प्रवासी ही धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत होता. गाडी पकडताना या प्रवशाचा हात निसटला आणि ड्युटीवर असलेल्या अंकुश ओमणे यांना हा प्रवासी दिसला आणि त्यांनी या प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरक्षा दलाचे इतरही कर्मचारी धावले आणि या प्रवाशाला वाचवले. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलीनाही. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अंकुश ओमणे यांनी कर्तव्यदक्षतेने ऑपरेशन 'जीवन रक्षा' अंतर्गत एका अज्ञात व्यक्तीचे प्राण वाचवल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी