Rupali Chakankar : चाकणकरांच्या 'त्या' फेसबुक पोस्टवर अश्लील कॉमेंट करणाऱ्या २८ जणांवर गुन्हा दाखल

state women ayog president rupali chakankar facebook post case : रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकवरती एक पोस्ट केली होती. या पोस्टवरती अनेकांनी अश्लील कॉमेंट केल्या होत्या. या प्रकरणी बार्शी पोलिसांमध्ये एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना काही व्यक्तींनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात अश्लील टीका देखील केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

state women ayog president rupali chakankar facebook post case
चाकणकरांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कॉमेंट प्रकरण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चाकणकर यांच्या विरोधात अश्लील कमेंटस् करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
  • रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरती केलेल्या पोस्टवरती केल्या होत्या अश्लील कॉमेंट
  • राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी दिली होती फिर्याद

Rupali Chakankar : सोलापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांच्या विरोधात अश्लील कमेंटस् करणाऱ्यांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २८ जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. चाकणकर यांना अश्लील कमेंटस् करणाऱ्या २८ जणांचा पोलीस आता शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.  

अधिक वाचा : पत्नी नताशाची जीन्स घालतो वरूण धवन, सांगितला अफलातून किस्सा

रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरती केलेल्या पोस्टवरती केल्या होत्या अश्लील कॉमेंट

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकवरती एक पोस्ट केली होती. या पोस्टवरती अनेकांनी अश्लील कॉमेंट केल्या होत्या. या प्रकरणी बार्शी पोलिसांमध्ये एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना काही व्यक्तींनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात अश्लील टीका देखील केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : बंडखोरीबद्दल एकनाथ शिंदेंवर आमदार प्रणिती शिंदेचा हल्लाबोल

 रुपाली चाकणकर यांनी काय केली होती पोस्ट?

रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमाबद्दल काही विचार व्यक्त करत वटपौर्णिमेच्या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होत की, 'मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही.'समाजाला सत्यावानाची सावित्री कळली. मात्र ज्योतिबांची सावित्री कळलीच नाही' असे विचार व्यक्त केले होते. त्यांच्या या विचारांवर सोशल मीडियावर अनेक ठिकाणी टीका-टिप्पणी झाली तर, अनेकांनी घाणेरड्या कॉमेंट केल्या होत्या.

अधिक वाचा : पैसे मोजताना करू नका 'ही' चूक, नाहीतर होईल लक्ष्मी मातेचा को 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी दिली होती फिर्याद

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनंतर आरोपी युवराज ढगे याने अश्लील कॉमेंट केल्याचे समोर आल्याने त्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मात्र, गुन्ह्यात वापरलेले कलम हे जामीनपात्र असल्याने युवराज ढगे यास जामीन देखील देण्यात आला. चाकणकर यांच्या पोस्टवरती हजारो कॉमेंट लय होत्या. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक कमेंटस् या अश्लील भाषेत होत्या. त्यामुळे पोलिसांनी यांसदर्भात गंभीर दखल घेतली. या सर्व एक हजार कमेंटसची पाहणी केल्यानंतर एकूण २८ व्यक्तींच्या कमेंटस या अतीशय खालच्या भाषेत असल्याचे आढळून आले. यातील बरेच आरोपी हे पुणे, नांदेड, सांगली या भागातील आहेत. त्यांचा देखील शोध सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी