म्हणून सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

सोलापूर
Updated Aug 25, 2019 | 10:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Supriya Sule vehicle fined by cop: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. शनिवारी सायंकाळी सोलापूर येथे हा प्रकार घडला आहे.

NCP MP Supriya Sule
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सुप्रिया सुळे यांच्या वाहनावर वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई
  • वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने वाहन चालकांवर कारवाई
  • ११ वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई
  • सुप्रिया सुळे यांच्या वाहनावर ही वाहतूक पोलिसांकडून कारवाई

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोलापूर येथे शनिवारी एका कार्यक्रमासाठी दाखल झाल्या. सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांच्या ताफ्यातील आणि कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्या होत्या. सोलापूर येथील डफरीन चौकात सुप्रिया सुळे शनिवारी संध्याकाळी पोहोचल्या. सुप्रिया सुळे यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात हजेरी लावली मात्र, त्याच दरम्यान सोलापूर वाहतूक पोलिसांनी सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

सुप्रिया सुळे शनिवारी सोलापूर येथे पोहोचल्या. सोलापुरातील डफरीन चौकात असलेल्या सभागृहात त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोलापूर शहरातील प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, अभियंता, उद्योजकांसोबत या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांचे कार्यकर्ते संध्याकाळच्या सुमारास पोहोचले. त्यासोबतच कार्यक्रमासाठी अेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली होती. या सर्व उपस्थितांच्या गाड्या डफरीन चौकातील रस्त्यावरच पार्क करण्यात आल्या होत्या. रस्त्यावर वाहने पार्क केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. 

ज्या ठिकाणी या गाड्या पार्क केल्या होत्या तो भाग नो पार्किंग झोन असल्याने पोलिसांनी तेथील ११ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांचे फोटोज काढले आणि सर्व वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या प्रत्येक वाहन चालकांकडून दोनशे रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ज्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या (एमएच १२ आरपी ३८३७) गाडीचाही समावेश आहे.

डफरीन चौकात असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहाच्या बाहेरील रस्त्यावर सर्व कार पार्क केल्या होत्या. रस्त्यावर कार पार्क केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचं वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. एकूण ११ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या सर्व वाहनचालकांनी दंडही भरला आहे.

राजकारणी नेते किंवा पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई होत असल्याचं खूपच कमीवेळा पहायला मिळतं. तसाच प्रकार आता सोलापुरात पहायला मिळाला आहे. वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर सोलापूर वाहतूक पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...