स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्याने पुलावरून नदीत मारली उडी, पहा पोलिसांनी केलेल्या रेस्क्यूचा थरारक व्हिडीओ

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा सुरु असताना मोठा अनर्थ टळला असल्याचे समोर आले आहे.

Swabhimani sanghatana activist jumped into the river from the bridge
स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्याने पुलावरून नदीत मारली उडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंचगंगेच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा त्याने प्रयत्न केला होता
  • पोलिसांनी आधीच यासाठी बंदोबस्त तैनात केला होता
  • राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेणार अशी घोषणा केली होती

पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा सुरु असताना मोठा अनर्थ टळला असल्याचे समोर आले आहे. परिक्रमा यात्रा (parikrma yatra) नृसिंहवाडीच्या पुलावर आली असता कोणाला काही समजायच्या आत एका कार्यकर्त्याने पुलावरून पंचगंगा नदीत उडी मारली. मात्र, सुदैवाने पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमच्या जवानांनी त्याला वाचवल्यामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला आहे, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी राजू शेट्टी यांनी नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली आहे.

पंचगंगेच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा त्याने प्रयत्न केला होता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने नृसिंहवाडी पुलावरुन पंचगंगा नदीत उडी मारली. पंचगंगेच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा त्याने प्रयत्न केला. बाहुबली सावळे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. राजू शेट्टी यांची नृसिंगवाडीमध्ये सभा सुरू होती. त्यांच्या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पोहोचत आहे. त्यांची सभा सुरू असताना हा प्रकार घडला. पंचगंगेच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा बाहुबली सावळे यांनी प्रयत्न केला होता.

पोलिसांनी आधीच यासाठी बंदोबस्त तैनात केला होता

कार्यकर्त्यांनी पुलाकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्याने पाण्यात उडी मारली होती. बाहुबली सावळे यांनी नदीच्या पंचगंगेच्या पत्रात उडी मारताच या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. पोलिसांनी आधीच यासाठी बंदोबस्त तैनात करून ठेवला होता. पंचगंगा नदीत दोन रेस्क्यू टीमच्या बोटी तैनात होत्या. त्यामुळे त्यांनी तातडीने धाव घेतली आणि बुडत असलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढलं. 

राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेणार अशी घोषणा केली होती

दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेणार अशी घोषणा केली होती. राजू शेट्टी यांनी केलेल्या घोषणेमुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त अगोदरच तैनात करून ठेवला होता. रेस्क्यू फोर्स जवानांच्या १० यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या होता. कुरुंदवाड येथील कृष्णा घाट, दिनकराव यादव पूल आणि नदी परिसरात बोटी तैनात आहेत. त्यामुळे आज मोठा अनर्थ अगदी थोडक्यात टळला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी