7th Pay Commission : या मोठ्या शहरातील महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वी गोड भेट, ७ वा वेतन आयोग लागू

7th Pay Commission latest update In marathi ।  गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतिक्षा होती ती प्रतिक्षा संपली आहे.  मकर संक्रांतीपूर्वी तोंड गोड करणारी बातमी सोलापूर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळाली आहे. 

Sweet gift before Sankranti to Solapur municiple Corporation officers and employees  7th pay commission will Apply
या महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू झाला वेतन आयोग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतिक्षा होती ती प्रतिक्षा संपली आहे.
  •  मकर संक्रांतीपूर्वी तोंड गोड करणारी बातमी सोलापूर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळाली आहे. 
  • सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने आज महापालिकेत जल्लोष करण्यात आला. 

7th Pay Commission good news  । सोलापूर :  गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतिक्षा होती ती प्रतिक्षा संपली आहे.  मकर संक्रांतीपूर्वी तोंड गोड करणारी बातमी सोलापूर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळाली आहे. 

सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने आज महापालिकेत जल्लोष करण्यात आला. 

7th pay commission : संक्रातीपूर्वी गोड बातमी,  शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना "या" महिन्यात मिळणार फरकाचा पहिला-दुसरा हप्ता 

संक्राती निमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोड भेट दिली आहे. यामुळे संक्राती निमित्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात खरी दिवाळी झाली आहे म्हणत जल्लोष करण्यात आलाय. 

संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं. एकमेकांना गोड भरूवुन आपण हा सण साजरा करत असतो.मुख्यमंत्र्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करून खऱ्या अर्थाने गोड भेट दिल्याचे मत यावेळी मनपा कामगार नेते आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

7th Pay Commission | केंद्र सरकारच्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नव्या सीटीजी नियमाचा फायदा

कालच राज्य सरकारने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली होती. यात सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला आणि दुसरा हप्ता येत्या फेब्रुवारी महिन्यात देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळाने घेतला आहे. या संदर्भात एक पत्र शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले. त्यावरून शिक्षक आणि शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांना आनंदाला पारावर राहिला नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी