तानाजी सावंतांकडून 24 तासात 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले अधिकारी !

Tanaji Sawant suspended the transfer of 22 officers in 24 hours ; राज्यातील 17 अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना देण्यात आली होती. ज्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती.

Tanaji Sawant suspended the transfer of 22 officers in 24 hours
सावंतांकडून 24 तासात 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागातील 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशाला स्थगिती दिली
  • 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याने बदल्यांना तात्पुरती स्थगिती
  • राज्यातील 17 अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना देण्यात आली होती.

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागातील 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. परंतु, या बदल्याच्या आदेशाला तानाजी सावंत यांनी स्थगिती दिल्याने अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शासनाने बदल्याचे आदेश काढल्याने काही अधिकारी हे रूजू होण्यासाठी निघाले होते. मात्र, काही अधिकाऱ्यांना त्याच्या बदल्यांना स्थगिती मिळाली आहे असं समजल्यानंतर हे अधिकारी अर्ध्या रस्त्यातून परत निघाले. मागील आठवडयात पोलिस विभागातील बदल्यांनाही अशीच स्थगिती दिली गेली होती. त्यानंतर आता आरोग्य विभागातील बदल्यांना स्थगिती दिल्याने राज्य शासनाचं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक वाचा ; फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याने बदल्यांना तात्पुरती स्थगिती

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बदल्यांना स्थगिती दिल्यावर एक पत्र काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याने या बदल्यांना तात्पुरती स्थगिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 17 अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना देण्यात आली होती. ज्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. यातील काही अधिकाऱ्यांना पदावनत करून पदस्थापना दिली होती. सोमवारी हे अधिकारी रुजू होण्याच्या तयारीत असताना तानाजी सावंत यांनी दिलेल्या बदल्याच्या स्थगितीमुळे त्यांना अर्ध्या रस्त्यातून पुन्हा आहे त्या ठिकाणी परतावे लागले आहे.

अधिक वाचा ; T20 World Cup: सेमीफायनल हरल्यानंतर हार्दिक पांड्या कोलमडला 

अश्या करण्यात आल्या होत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?

डॉ मनोहर बनसोडे हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून उपजिल्हा रुग्णालय शहापूर (जि ठाणे) येथे होते. त्यांची बदली उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांची बदली नागपूर या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून झाली होती. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून प्रशासकीय बदली झाली होती. गेवराई(बीड) येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक असणाऱ्या डॉ. महादेव चिंचोले यांची धुळे येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून प्रशासकीय बदली झाली होती. बीड येथील रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक हुबेकर यांची प्रशासकीय बदली ही कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून झाली होती. हे सर्व अधिकारी तात्काळ कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर राहावे असे आदेश 11 नोव्हेंबर रोजी देण्यात आले  होते.

अधिक वाचा ; या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, गुंतवणुकदारांच्या उड्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी