सोलापूर : लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो इच्छुक नवरदेवांनी बाशिंग बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आम्हाला बायको मिळवून द्या’, या मागणीसाठी मोर्चा काढला. या इच्छुक नवरदेवांची चक्क घोड्यावर बसून वाजतगाजत वरात काढण्यात आली. (The bridegroom marched on horseback for the bridegroom)
अधिक वाचा : ....तर कोयनेचे पाणी सोडणार नाही, देसाईंचे कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांना प्रत्युत्तर
राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांची लग्न न झाल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तरुण मुलं गैरमार्गाला लागली आहेत. तर काहींना त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधनण्यासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने आज दुपारी सोलापूरात मोर्चा काढण्यात आला.
अधिक वाचा : लांडोर खरंच अश्रू पिवून गर्भवती होते? गुगलवर आहेत वेगवेगळी उत्तरे; काय आहे सत्य जाणून घ्या
आज विविध जाती आणि धर्मांमध्ये मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलींंचा जन्मदरदेखील मुलांच्या तुलनेत कमी असल्याने लग्नायोग्य मुली मिळेनाशा झाल्या आहेत. अनेकदा मुलींकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असल्याने लग्नायोग्य मुली मिळणे दुरापास्त झाले आहे.
अधिक वाचा : Swiggy: 'या' व्यक्तीने स्विगीवर केली तब्बल 75378 रुपयांची ऑर्डर; तर दुसरी दुसरी सर्वात मोठी ऑर्डर दिली पुणेकराने
मुले व मुली यांच्या व्यस्त प्रमाणामुळे गावोगावी अनेक मुले लग्नाविना राहिली.आपली लग्ने आता होणार का, या चिंतेत मुलांसह त्यांचे पालकही चिंतेत आहेत. याचाच फायदा घेत, फसवून लग्न लावण्याचे प्रमाण वाढले आहे.
तरुणांना सशक्त करणे ही सरकारची जबाबदारी असून याबाबत सरकारने विचार करावा यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या लग्न न झालेल्या अनेक तरुण मुलांचा विचार करून तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे इच्छुक वरांनी सांगितले.