सोलापूर : सोशल मिडियावर(Social Media) आपल्याला चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टी शिकता येतात. सध्या देशातच नवे तर जगात लोक सोशल मिडियाचा वापर करू लागले आहेत. जेवढा सोशल मिडियाचा वापर चांगला होत आहे तेवढाच वाईट देखील केला जात आहे. सोशल मीडियावरून झालेले वाद, तंटे याच्या बातम्या आपण सतत ऐकत असतो. मात्र, आता याचं सोशल मिडियामुळे सोलापूर जिल्ह्यातील एक गाव अक्षरशः कंटाळले असून, गावातील जवळपास ४० ते ५० महिलांनी याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात दिली आहे.
अधिक वाचा ; पार्थ चॅटर्जींच्या घरावर चोरांचा डल्ला, शेजाऱ्यांना वाटली ED
सोलापूर जिल्ह्यातील नामांकित असलेले गाव म्हणजे मळेगाव. या गावाची लोकसंख्या ३६०० आहे. मळेगावचे बहुतांश लोक हे उच्चशिक्षित असल्याने या गावची ओळख बार्शीत तालुक्यातच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आहे. मळेगाव विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले गाव आहे. राज्यभरात जलयुक्त शिवार अभियानमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने मळेगावची सर्वत्र ओळख आहे. याशिवाय तंटा मुक्त अभियानामध्ये विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मात्र, हे गाव आता सोशल मिडियामुळे त्रस्त झालं असल्याचं समोर आले आहे. कारण, कोणीतरी एका व्यक्तीने फेसबुक या सोशल मिडीयाच्या माध्यमातून गावातील महिलांची बदनामी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, गावातील महिला होत असलेल्या बदनामील कंटाळले आहेत. वैतागलेल्या या गावातील जवळपास ४० ते ५० महिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
अधिक वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम
सदर फेसबुक ग्रुपचे नाव अज्ञाताने 'मळेगाव पोलखोल' असं ठेवले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तो महिलांची बदनामी करत आहे. त्याचबरोबर, महिलांविषयक आक्षेपार्ह आणि बदनामी करणारे पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे, गावातील महिलांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. त्यांचे संसार मोडले जात आहे. नांदायला गेलेल्या विवाहित महिलांचे नांदने अवघड झाले आहे. केवळ महिलांची बदनामीच नव्हे तर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट देखील या ग्रुपवर शेअर केल्या जात आहेत. गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे. गावातील प्रतिष्ठीत पुरुष, महिला यांची बदनामी केल्या जाणाऱ्या पास्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे या अकाऊंटची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ४० ते ५० महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अधिक वाचा ; BMC म्हणते की, मुंबईत आतापर्यंत 18 हजार खड्डे बुजवले