महाराष्ट्र हादरला ! हात पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, पहा घटनेचा व्हिडीओ

The laborers were beaten with their hands and feet tied : मजुरांना गुत्तेदाराने तुमच्या कामाचे पैसे घेवून जावा असा निरोप पाठवला होता. सदर निरोपानंतर मजूर तत्काळ गुत्तेदाराच्या घरी आले. यावेळी त्याठिकाणी ४ ते ५ जण मजुरांची वाट पाहत थांबले होते. या सर्वांनी मजुरांना बळजबरीने बसवून घेतले. आणि  या दोघांचे हात पाय एका दोरीच्या साह्याने बांधले आणि  या मजुरांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

The laborers were beaten with their hands and feet tied
हात पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, पहा घटनेचा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलवून गुत्तेदाराने दोन मजुरांना बेदम मारहाण केली
  • आरोपींनी मारहाण करत मजुरांना शिवीगाळ देखील केली आहे
  • चार आरोपींविरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल

सोलापूर : कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलवून गुत्तेदाराने दोन मजुरांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भूताष्टे या गावात घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुत्तेदाराने मजुरांना माराहण केल्याचा व्हिडीओ देखील शूट केला होता. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडिया वरती व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही व्यक्ती दोघांना मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान, सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली आहे.

अधिक  वाचा ; पंकजा मुंडे येत्या रविवारी हाती घेणार ‘सूत्रं’

आरोपींनी मारहाण करत मजुरांना शिवीगाळ देखील केली आहे

दरम्यान, सदर व्हिडीओत आरोपी हे पांढऱ्या दोरीने मजुरांना मारताना दिसत आहेत. त्याचबरोबर आरोपींनी मजुरांना शिवीगाळ देखील केली आहे. ही धक्कादायक घटना माढा तालुक्यातील भुताष्टे गावात घडली आहे. सदर मजुरांना गुत्तेदाराने तुमच्या कामाचे पैसे घेवून जावा असा निरोप पाठवला होता. सदर निरोपानंतर मजूर तत्काळ गुत्तेदाराच्या घरी आले. यावेळी त्याठिकाणी ४ ते ५ जण मजुरांची वाट पाहत थांबले होते. या सर्वांनी मजुरांना बळजबरीने बसवून घेतले. आणि  या दोघांचे हात पाय एका दोरीच्या साह्याने बांधले आणि  या मजुरांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यावेळी पांढऱ्या दोरीने पाठीवर तसेच अंगावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर मारहाण होत असताना यातीलच एकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. सदर व्हिडीओ सोशल मिडियावरती तुफान व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  ; धनश्रीला घरात वावरणही का झालं कठीण; जाणून घ्या काय आहे कारण 

चार आरोपींविरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल

मिळालेय माहितीनुसार, विकास नाईकवाडे आणि कसबे हे दोघे मजुर मागील दोन महिन्यांपासून कामाला होते. कामाचे पैसे घ्यायला ये असं सांगून या दोघांना आरोपी बालाजी मोरे, भालचंद्र आनंत यादव यांच्यासोबत आणखी चार जणांना मारहाण केली आहे. सदर घटनेनंतर आरोपींवर मजूर विकास नाईकवाडे आणि कसबे या दोघांना गुत्तेदाराने गायब गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात अॅट्रासिटी,मारहाण, आणि अपहारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, [पोलिसांनी तत्काळ या चौघांना अटक देखील केली असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी Best पर्याय 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी