''तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली", सुशील कुमार शिंदेंचं मोठं वक्तव्य

Sushilkumar shinde : ''नवजोतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही, खेळात जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न केले. मुख्यमंत्री सोबत जमवून घेतले नाही.'' असं म्हणत त्यांनी 'नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Giving formulas to the youth cost the Congress dearly
''तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं,तिथं आमची गफलत झाली"  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली - सुशीलकुमार शिंदे
  • नवजोतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही - सुशीलकुमार शिंदे
  • देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : कॉंग्रसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक मोठ वक्तव्य केलं आहे. , ''तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली, असं मला वाटत. मात्र अशी मी पक्षावर थेट टीका करू शकणार नाही. असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मोदींनी सोलापूरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होत. मात्र  एक ही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले, त्याचबरोबर २०१४ नंतर अग्रेसिव्ह प्रचार करणारा मोदी सारखा नेता मिळाला. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. असंही काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हटलं आहे.  

अधिक वाचा : या लोकांसाठी आधार-पॅन लिंक करणे आवश्यक नाही, तुमचे काय...

नवजोतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही

दरम्यान, पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ''नवजोतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही, खेळात जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न केले. मुख्यमंत्री सोबत जमवून घेतले नाही.'' असं म्हणत त्यांनी 'नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही १० वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही अॅक्टिव्ही नव्हतो. त्यामुळे संघटना बांधनी झाली नाही. एकट्या राहुल गांधीना दोष देणे शक्य नाही, पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता. असंही शिंदे म्हणाले. ''तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली, असं मला वाटत. मात्र अशी मी पक्षावर थेट टीका करू शकणार नाही. असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा : 'अमोलने राजकारणाच्या गटारगंगेत वक्तृत्वाची तलवार चालवू नये'

देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत

लोक भाजपचा तिरस्कार करतील. देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत. केवळ आकडे फुगवून चालणार नाही. काँग्रेसकडे हे भाजप पेक्षा वेगळं आहेत. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सध्या जात, धर्मावर सर्व राजकारण सुरु आहे. हे जास्त काळ चालणार नाही, सगळं बदलेल, असंही शिंदे म्हणाले.

अधिक वाचा : हिंदू नसल्याने महिलेला मंदिरात भरतनाट्यम सादर करण्यास मनाई 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी