Twin Sister Marriage : जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या तरूणाला न्यायालयाकडून दिलासा

Twin Sister Marriage : रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने तक्रार केली नसल्याने पोलिसांना तपास करता येणार नाही असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या तरूणाला दिलासा मिळाला आहे.

थोडं पण कामाचं
  • रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने तक्रार केली नसल्याने पोलिसांना तपास करता येणार नाही
  • असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या तरूणाला दिलासा मिळाला आहे.
  • अतुल आवताडे या तरूणाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Twin Sister Marriage : सोलापूर : रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने तक्रार केली नसल्याने पोलिसांना तपास करता येणार नाही असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या तरूणाला दिलासा मिळाला आहे. अतुल आवताडे या तरूणाने जुळ्या बहिणींशी विवाह केला अकलूज येथे झालेल्या या विवाहाची खूप चर्चा झाली हिंदू कायद्यानुसार एका वेळी दोघींशी विवाह करता येत नसल्याने अकलूज पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता  तपासाकरता पोलीसांनी माळशीरस न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, मात्र रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने तक्रार केली नसल्याने तपास करता येणार नाही असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या अतुल आवताडे या तरूणाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी