जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्याविरोधात अदलखलपात्र गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये एका तरुणाने एकाचवेळी एकाच मांडवात जुळ्या बहिणींशी लग्न केले. या प्रकरणी जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुल उत्तम अवताडे विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे.

Twin sisters marrying same man
जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्याविरोधात अदलखलपात्र गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्याविरोधात अदलखलपात्र गुन्हा दाखल
  • आयटी इंजिनिअर आहेत जुळ्या बहिणी
  • २ डिसेंबर 2022 रोजी झाला विवाह

Twin sisters marrying same man : Now, Solapur police book groom for non-cognizable offence : महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात एक बेकायदा म्हणता येईल अशी घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये एका तरुणाने एकाचवेळी एकाच मांडवात जुळ्या बहिणींशी लग्न केले. या प्रकरणी जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुल उत्तम अवताडे विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR (Non Cognizable Report) दाखल झाला आहे.

अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर २ मध्ये राहणाऱ्या तरुणाने २ डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी दोन मुलींशी लग्नाच्या प्रकरणात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Devendra Fadanvis : या तारखेला समृद्धी महामार्गाचे होणार लोकार्पण, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

Raj Thackeray : कोकणात प्रकल्प आले तर स्थानिकांना कळत नाही ? राज ठाकरे यांचा सवाल

एकाच मांडवात दोन जुळ्या मुलींशी विवाह

मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत विवाह केल्याची घटना महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली. जुळ्या बहिणींशी लग्न करणारा अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील मूळ रहिवासी आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

आयटी इंजिनिअर आहेत जुळ्या बहिणी

कांदिवलीच्या कॉलेजमधून आयटी इंजिनिअरिंग करून गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणीनी अतुलशी एकाच वेळी एकाच मांडवात विवाह केला आहे. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून आजवर त्या दोघी एकाच ताटात जेवतात असे काही जणांनी सांगितले. 

२ डिसेंबर 2022 रोजी झाला विवाह

बालपणापासून एकत्र राहत असलेल्या पिंकी आणि रिंकीला शेवटपर्यंत सोबतच राहायचं आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. कायम एकत्र राहण्यासाठी त्यांना एकच नवरा हवा होता. अखेर अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे २ डिसेंबर 2022 रोजी हा विवाह संपन्न झाला.

विवाहाचे कारण 

पिंकी आणि रिंकीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तेव्हा दोन्ही मुली गावातील घरात आईसोबत होत्या. तिथे असताना दोन्ही मुली आणि त्यांची आई एकाचवेळी आजारी पडले. या घडामोडी घडल्या तेव्हा अतुल गावातच होता. याच कारणामुळे आजारी असताना तिघीजणी अतुलच्या कारमधून डॉक्टरांकडे जात येत होत्या. अतुलने पाडगावकर कुटुंबाची आजारपणात सुश्रुषा केल्याने त्यांच्यातील जवळीक वाढली. पुढे पिंकी आणि रिंकीने अतुलशी लग्न करून कायमचे एकत्र राहण्याचा विचार केला. आवताडे कुटुंबाशी चर्चा करून त्यांनी सर्वांची लग्नाला संमती मिळविली.

अखेर २ डिसेंबरला अतुल अवताडेने पिंकी आणि रिंकी पाडगावकर या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास ३०० पाहुणे मंडळी गलांडे हॉटेलमध्ये जमली होती. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एकाचवेळी दोन जणींशी लग्न केल्याचे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि अतुलच्या अडचणी वाढल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी