Two died in car accident : पंढरपूर : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत जाताना मोहोळ रोड देगाव पाटीजवळ अर्टिगा कार (MH 11 1942) आणि एसटी बस यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
पंढरपूरहुन सोलापूरच्या दिशेने निघालेली अर्टिगा कार आणि उस्मानाबाद कोल्हापूर बस यांची धडक झाली. धडकेनंतर अर्टिगा कार उलटली आणि रस्त्याच्या कडेला गेली.
अपघातस्थळी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक पोहोचले आहे. पोलिसांनी सहा जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे.