सोलापूर : घरगुती वाद इतका विकोपाला गेला की, या वादातून चक्क गोळीबार झाल्याची घटना सोलापूर येथे घडली आहे. या घटनेत एक १३ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. मुलावर सध्या सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरूं आहेत. मामानं गोळी झाडताच भाच्यानं डावा हात मध्ये घातल्यानं कोपराच्या खालच्या बाजूला गोळी लागली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : आज राज ठाकरेंची हायहोल्टेज सभा, जाणून घ्या कधी अन् कुठे?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर धक्कादायक घटना ही घरगुती भांडणातून झालेला वाद विकोपाला गेला आणि यातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बहिणीला होणाऱ्या त्रास भावाला सहन न झाल्याने 'आमच्या बहिणीला का त्रास देता' असा जाब भावाने भाऊजीला विचारला. यावेळी जवळचं उभ्या असलेल्या सार्थकने आपल्या वडिलांची बाजू घेत मामला उलट सुलट बोलला यावेळी मामाने आपल्याजवळील पिस्तुल काढलं आणि भाच्यावर गोळी झाडली. यावेळी सार्थकनं आपला डावा हात वर केल्यानं कोपराच्या खालच्या बाजूस पिस्तुलची गोळी लागली. यात गंभीर जखमी अवस्थेतील सार्थकला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अधिक वाचा ; दोन- तीन दिवसात केऱळात धडकणार मान्सून, मग महाराष्ट्रात कधी?
सदर गोळी लागलेल्या भाच्याचे नाव सार्थक महादेव मस्क असं आहे. तर भाग्यवान गायकवाड असं आरोपी मामाचे नाव आहे. सार्थक महादेव मस्के याने मामा आणि वडिलाच्या वादात वडिलाची बाजू घेतल्याने संतापलेला मामा भाग्यवान गायकवाड यानं १३ वर्षीय भाच्यावर पिस्तुलमधून गोळी झाडली. या घटनेनंतर आरोपी ममावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १३ वर्षीय भाच्यावर सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक वाचा : रेप करणं बंद करा, ओरडली कान्समध्ये आलेली टॉपलेस महिला