विजयसिंह मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीचा दणका 

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे काँग्रेसशी हात मिळवणी करणार आहे धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत (Dhawalsinh Mohite Patil Congress)

Vijaysinh Mohite Patil Nephew Dhawalsinh Mohite Patil will join Congress
विजयसिंह मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीचा दणका   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • ष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या विजयसिंह मोहित पाटील आणि त्यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे.
  • विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे काँग्रेसशी हात मिळवणी करणार आहे.
  • उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या विजयसिंह मोहित पाटील आणि त्यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे काँग्रेसशी हात मिळवणी करणार आहे. उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे.   धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. 

मोहिते पाटील पितापुत्र भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अध्यक्ष शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होते. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील समिकरणं बदलली होती. 

धवलसिंह मोहितेंच्या उमेदवारीची चर्चा फोल

सध्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह आणि रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. काका आणि चुलत बंधू भाजपात गेल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत धवलसिंहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न झाला होता. धवलसिंह यांचं नाव राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं. पण आता ते काँग्रेसचा हात धरत असल्याने भुवया उंचावल्या आहेत. 

मोहिते पाटील घराण्याला काँग्रेसचा शह

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनमध्ये उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसच्या नेत्यांना आहे. मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेस भाजपला राजकीय शह देण्याच्या प्रयत्नात आहे.

पंढरपूर- मंगळवारचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीचे लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यामुळे आता पंढरपूर भागात वर्चस्व असलेल्या मोहिते घराण्यातील एक मोहिते पाटील महाविकास आघाडीत आल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी