मुन्ना महाडिकांच्या मुलाने अमेरिकेत एक कोटीचं पॅकेज सोडलं, मायदेशी आल्यावर वडिलांनी दिलं मोठ गिफ्ट

Vishwaraj Dhananjaya Mahadik was appointed as the chairman of the factory ; विश्वराजमहाडिक यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतले होते. विश्वराज यांना एक कोटीं रुपयाच्या पॅकेजची नौकरी देखील होती. मात्र, ती नौकरी नाकारुन विश्वराज यांनी मायदेशी येण्याचा निर्णय घेतला.

Vishwaraj Dhananjaya Mahadik was appointed as the chairman of the factory
मुन्ना महाडिकांच्या मुलाने अमेरिकेत एक कोटीचं पॅकेज सोडलं  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एक कोटी रुपयाच्या नौकरीची ऑफर सोडून विश्वराज महाडिक मायदेशी
  • मायदेशी आल्यावर वडलांकडून मिळाले मोठ्र गिफ्ट
  • कारखान्याचे चेअरमन म्हणून विश्वराज धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली

सोलापूर : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाने अमेरिकेतली मोठ्या पगाराच्या नौकरीची ऑफर सोडून मायदेशी परतले आहेत. खासदार महाडिक यांचे सुपुत्र मायदेशी परतल्यावर त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ते गिफ्ट म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. कारखान्याचे चेअरमन म्हणून विश्वराज धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी सुरेश जगताप यांनी बिनविरोध निवड झाली आहे. विश्वराज हे महाडिकांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व आहे.

अधिक वाचा ; Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे,त्वचा होईल मुलायम

1 कोटी रुपयाची नौकरीची ऑफर सोडून विश्वराज मायदेशी परतेल

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वराज महाडिक यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतले होते. विश्वराज यांना एक कोटीं रुपयाच्या पॅकेजची नोकरी देखील होती. मात्र, ती नोकरी नाकारुन विश्वराज यांनी मायदेशी येण्याचा निर्णय घेतला. आता भीमा कारखान्याच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात पदार्पण केलं आहे.

अधिक वाचा ; 'या' गावात 6 वाजता वाजतो सायरन आणि टीव्ही, मोबाईल होतात बंद 

विश्वराज महाडिक कोण आहेत?

विश्वराज महाडिक यांचा जन्म 17 मे 1996 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण कोल्हापुरातच झालं. पैलवान आजोबांप्रमाणेच त्यांची उंचीही 6 फुटांपेक्षा अधिक आहे. विश्वराज हे भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत. माजी आमदार महादेव महाडिक हे विश्वराज यांचे चुलत आजोबा. विश्वराज महाडिकांच्या रुपाने कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. दोन वर्ष नोकरी करुन त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. वडील म्हणाले होते की तिथेच राहा, मात्र आपल्याला घराची ओढ असल्यामुळे स्वतः निर्णय घेतला, अशी माहिती विश्वराज यांनी दिली. विश्वराज महाडिक यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ही जगभरातील टॉप युनिवर्सिटीपैकी एक मानली जाते. कॉलेजमध्ये असतानाच विश्वराज यांना जवळपास एक कोटींच्या पॅकेजची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती नाकारुन कोल्हापुरात परतण्याचा निर्णय घेतला, असा दावा धनंजय महाडिकांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी