Vitthal Temple : पंढरपूर : विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे मुळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या काळातील विठ्ठल मंदिर कसे असेल याची उत्कंठा अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिली असताना पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र काम सुरू झाले नाही आता या संदर्भात मुंबईत बैठक संपन्न झाल्याने काम सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाच टप्प्यात आराखड्याचे काम केले जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन काम लवकर सुरू करून विठ्ठल मंदिराच्या मुळ हेमाडपंथी रूपाचे दर्शन घडवावे अशी मागणी भाविक करू लागले आहेत. (vitthal temple renovation for original way maharashtra government approved plan)