SOLAPUR : झोपेच्या गोळ्या, दोरी, चाकूची खरेदी!, प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा काढला काटा

Crime news : अक्कलकोटमध्ये प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला प्रियकरासह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पत्नीनचं आपल्या पतीची हत्या झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती.

Wife killed husband with boyfriend in Solapur
SOLAPUR : झोपेच्या गोळ्या, दोरी, चाकूची खरेदी!, प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा काढला काटा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सोलापुरात प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या
  • व्हॉट्सअप चॅट देखील यावेळी पोलिसाच्या हाती लागले.
  • प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावचा दशरथ नारायणकर हा आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. त्याच्या पत्नीचे बाबासाहेब बाळशंकर या तरूणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी अरूणाने प्रियकर बाबासाहेब बाळशंकर याच्या मदतीने पती दशरथचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. (Wife killed husband with boyfriend in Solapur)

अधिक वाचा : Devendra Fadnavis : गोपीनाथ मुंडेचे स्वप्न पूर्ण, आता रेल्वे परळीपर्यंत नेणार - देवेंद्र फडणवीस 

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास बाबासाहेबाने दशरथचा घरात शिरून खून केला. पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. पण, गुन्हे शाखेच्या तपास पथकाने खूनाची माहिती काढून संशयित आरोपीला काही तासांतच पकडले.

मृत दशरथ आणि त्याची पत्नी अरूणा आपल्या मुलीसोबत जुना विडी घरकूल परिसरातील केकडे नगरात राहत होते. सुरवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण, पहाटेच्या सुमारास झालेला खून आणि पत्नीच्या जबाबावरून पोलिसांना वेगळचा संशय आला. तत्पूर्वी, पतीच्या खूनाची फिर्याद पत्नी अरूणा नारायणकर हिनेच स्वत: एमआयडीसी पोलिसांत दिली होती. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर पोलिसांना घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी बाबासाहेब बाळशंकर हा त्याठिकाणी आल्याची माहिती मिळाली.

अधिक वाचा :Crime News धक्कादायक! खंडोबा मंदिरातील पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी त्याच्या क्रमांकावर कॉल केला, पण त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. गुन्हे शाखेचे तीन पथके त्याच्या शोधात होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने बाबासाहेब बाळशंकर याला मुळेगाव क्रॉस रोडवरून रात्री साडेनऊच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. दोघांनी दिलेल्या कबुलीतून दोघांच्या सहभागातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी