मोठी बातमी ; महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या 'या' पैलवानाच निधन

१९९२ साली महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) किताब पटकावणारे दक्षिण सोलापूर (solapur) तालुक्यातील बोरामणी येथील पैलवान आप्पालाल शेख (appalal shaikh) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

Wrestler appalal shaikh death
भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या 'या' पैलवानाच निधन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा
  • मागील काही दिवसापासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते.
  • एकाच घराण्यामध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी असलेले राज्यातील आप्पालाल शेख यांचे एकमेव कुटुंब

सोलापूर : १९९२ साली महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) किताब पटकावणारे दक्षिण सोलापूर (solapur) तालुक्यातील बोरामणी येथील पैलवान आप्पालाल शेख (appalal shaikh) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्र केसरी सह राष्ट्रकुल स्पर्धेत देखील आप्पालाल शेख विजेते होते. आप्पालाल शेखयाचं मृत्यू समयी ५५ वर्षे इतक वय होतं. त्यांच्या अकाली जाण्याने लाल मातीवर शोककळा पसरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे तसेच हे नामवंत मल्ल होते.

आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा

आप्पालाल यांचे बंधू इस्माईल शेख हे १९८० सालचे महाराष्ट्र केसरी होते. त्यांच्यापाठोपाठ १९९२ साली आप्पालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्यामुळे आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा होता असचं होता.

मागील काही दिवसापासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आप्पालाल शेख हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. शेख यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांना या आजाराचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. 

एकाच घराण्यामध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी असलेले राज्यातील आप्पालाल शेख यांचे एकमेव कुटुंब

२००२ साली त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले होते. एकाच घराण्यामध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी असलेले राज्यातील आप्पालाल शेख यांचे एकमेव कुटुंब होते. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मजल मारत तेथे देखील सुवर्णपदक पटकावले होते. मागील काही दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी