सोलापूर : पैसे बुडवायचे म्हणून राष्ट्रवादीला सदाभाऊ मध्ये आणत आहेत, पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या ढाब्याचे 66 हजार रुपये बिल द्या. असा खुलासा हॉटेलचे मालक अशोक शिंगारे यांनी केला आहे. (Hotel owner's revelation in Sadabhau Khot's loan case)
भाजप नेते सदाभाऊ खोत यांच्या मुलाने आणि इतराच्या जेवणाचे बिल दिले नाही. म्हणून ढाबामालक अशोक शिंगारे यांनी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. यानंतर अशोक शिंगारे यांच्यावर सदाभाऊ खोत यांच्या निकटवर्तीयाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. तसेच शिंगारे यांच्यावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला.या सर्व आरोपावर आणि सदाभाऊकडे उधार असलेल्या बिलाबाबत अशोक शिंगारे यांनी आज माध्यमांकडे खुलासा केला आहे.