Pandharpur कॉरिडॉरचा घाट कशासाठी?, स्थानिकांच्या आंदोलनास अमोल मिटकरींचा पाठिंबा

Pandharpur corridor : पंढरपूर काॅरिडाॅरमुळे सध्या मंदिर परिसरातील बाधित होणाऱ्या शेकडो व्यापारी आणि नागरिकांनी आपल्या घरांवर आणि दुकानांवर आराखड्याला विरोध करणारे काळे फलक लावले आहेत. कॉरिडॉरला लोकांकडून विरोध सुरु असताना विकास आराखडा राबविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये शासनाबद्दल रोषाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. 

Local opposition to Pandharpur pilgrimage development plan
Pandharpur कॉरिडॉरचा घाट कशासाठी?, स्थानिकांच्या आंदोलनास अमोल मिटकरींही पाठिंबा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध
  • विठ्ठल मंदिर परिसरातील मिळकती बाधित होणार
  • स्थानिकांच्या आंदोलनास अमोल मिटकरींचा पाठिंबा

पंढरपूर (संतोष कुलकर्णी) : वाराणसी धर्तीवर नियोजित तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर रद्द व्हावा, ही मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा पंढरपूरचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्थानिकांच्या पंढरपूर काॅरिडाॅर रद्दच्या मागणीला पाठिंबा दिला. हिवाळी अधिवेशनात पंढरपूरच्या कॅरिडॉरचा मुद्दा मांडणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितली. (Local opposition to Pandharpur pilgrimage development plan)

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले, पंढरपूर आणि काशीची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे काशीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर करण्याचा निर्णय सरकारने रद्द करावा काॅरिडाॅरमुळे अनेक मंदिरे मठ पाडले जाणार आहेत त्यामुळे पंढरपूरचे वैभव नष्ट होणार आहे याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली. 

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. परंतु हा आराखडा राबविताना विठ्ठल मंदिर परिसरातील मिळकती बाधित होणार आहेत. त्यामुळे संबंधित मिळकतदारांसह व्यापाऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी गठीत झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीने गेल्या १७ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात मोर्चा काढला होता. त्यानंतर याच प्रश्नावर शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी