सोलापूर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बंडखोर आमदार घेऊन गुवाहटीमध्ये बसले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची शक्यता दिसून येत आहे. (MLA Praniti Shinde's attack on Eknath Shinde over mutiny)
मात्र,"ज्या माणसासाठी एवढं केल त्याच माणसाने उद्धवजींना दगा दिला ,'घर का भेदी लंका ढाये' असं म्हणत सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेने एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.
त्याचबरोबर हे सरकार काही पडणार नाही,महाविकास आघाडी सरकार आपली टर्म पूर्ण करेल असा विश्वास ही प्रणिती शिंदेनी व्यक्त केला आहे.
आज सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस कडून 'अग्निपथ योजने'विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते