सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावरून एकामागून एक गाड्या टोल नाका पास करीत होत्या. एवढ्यात भगवा झेंडा लावून आलेली वारकऱ्यांची जीप टोलनाक्यावर आली. (Who is the Chief Minister? Pay the toll first; Arrogance of the employee at the toll booth with the Warakaris)
अधिक वाचा : दररोज नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे
टोलवर येताच जीप मधील वारकऱ्यांनी विठ्ठलाचा जयघोष केला. नाक्यावरील कर्मचाऱ्यांने टोलच्या पैशाची मागणी केली. यावेळी त्या गाडीतील वारकऱ्यांनी सांगितलं आम्ही वारकरी आहोत. पंढरपूरला निघालोय मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली आहे टोल घेऊ नका.
यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्याने कोण मुख्यमंत्री माहित नाही. ते केबिनमध्ये बसून काहीही सांगतात, अगोदर पैसे द्या असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या वारकऱ्यांनी टोलनाक्यावर वाद घातला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर दिसून आले.
अधिक वाचा : मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आहेत उत्तम स्रॅक्स
वारकऱ्यांना टोलमाफीची घोषणा कागदावरच? टोलनाक्यावरील कर्मचारी म्हणतात आम्हाला जीआर मिळाला नाही, VIDEO VIRAL @mieknathshinde @CMOMaharashtra pic.twitter.com/6CAZ6gQCbP — Timesnowmarathi (@timesnowmarathi) July 8, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आषाढी एकादशी (Ashadi Ekdashi) निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.
अधिक वाचा : किडनी स्टोनचे रुग्ण डाळिंब खाऊ शकतात का?
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ही घोषणा कागदावरच असल्याचे समोर आले आहे. याचा अनुभव अकोल्यातील वारकरी बांधवांना आलाय. अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील एका टोल नाक्यावर त्यांच्याकडून वसुली करण्यात आली. बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या टोल नाक्यावर आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलण्यात आले आणि वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली.