[video] पालघर : डहाणूतील फटाका कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील घरे स्फोटांनी हादरली

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Jun 17, 2021 | 14:07 IST

फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

10 injured in a factory blast in Dahanu, Maharashtra.
पालघर : डहाणूतील फटाका कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील घरे स्फोटांनी हादरली  

थोडं पण कामाचं

  • फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
  • स्फोटानंतर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
  • या स्फोटात १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती टाइम्स नाऊ मराठीच्या हाती आली आहे. 

पालघर :  फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या विशाल फटाका कंपनीत हा प्रकार घडला आहे. या स्फोटात १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती टाइम्स नाऊ मराठीच्या हाती आली आहे. 

या फटाका कंपनीमध्ये नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्यानंतर झालेला स्फोट इतका प्रचंड होता की परिसरात जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत त्याचा धक्का बसला आहे. घटनास्थळावर अग्निशमन दल पोहोचलं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी