Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे
भरत जाधव
Updated Nov 12, 2022 | 15:54 IST

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला आव्हाडांनी मारहाण केली होती.  दरम्यान या मारहाणी प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी आव्हाड आणि  राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह 11 जणांना अटक केली होती.

 14 days judicial custody to Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला आव्हाडांनी मारहाण केली होती.
  • शुक्रवारी पोलिसांनी आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह 11 जणांना अटक केली होती.
  • ठाणे न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली.

Jitendra Awhad : ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall)मारहाण केल्याप्रकरणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना काल अटक करण्यात आली होती. आज आव्हाड यांना न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची  (Judicial Custody) शिक्षा सुनावली आहे.  (14 days judicial custody to Jitendra Awhad )

अधिक वाचा  :  सूर्यास्तानंतर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला आव्हाडांनी मारहाण केली होती.  दरम्यान या मारहाणी प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी आव्हाड आणि  राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह 11 जणांना अटक केली होती. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि 11 कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते. ठाणे न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली.  दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दुपारी 2 वाजेच्या सुमारास या प्रकरणी निर्णय दिला.

अधिक वाचा  : 'उत्तर भारतीय बिल्डरसाठी ठाकरेंना माझं...' किर्तीकर बरसले

दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आव्हाडांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, आव्हाडांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.  दरम्यान, हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं.

राजकीय हस्तक्षेप नाही 

जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्यात राजकीय हस्तक्षेप नाही. 

अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया 

"आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.", असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी