भिवंडीत "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा देणाऱ्या १९ जणांना अटक

ठाणे
Updated Jan 03, 2023 | 21:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

भिवंडी येथील एका शाळेत १२ वर्षीय विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १९ जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यात १४ वर्षांच्या मुलाने दिली
14 year boy in Thane shouts "Pakistan Zindabad"  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भिवंडीतील एका शाळेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
  • आंदोलन सुरू केलं कारण..
  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाऊलावर

ठाणे : भिवंडी येथील एका चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाने "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा दिल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी महानगरपालिका शाळेच्याबाहेर 19 जणं घोषणाबाजी करत होते, ज्यात पाच स्त्रियांचा समावेश होता. या गटाला सामाजिक वातावरण बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे.

(In Thane, a 14-year-old kid in a school uniform shouts "Pakistan Zindabad")

अधिक वाचाः महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरू

आंदोलन का सुरू केलं? 

भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यालया बाहेर १४ वर्षीय शाळकरी मुलासह त्याचे आई - वडिल आंदोलन करत होते. मुलाला खासगी शाळेत बसायची परवानगी नाकारल्यामुळे पालकांनी निषेध दर्शवण्यासाठी घोषणाबाजी करायला सुरवात केली होती. खरंतर त्याच्या पालकांनी शाळेची फी भरली नव्हती, त्यामुळे शाळेने मुलाला प्रवेश नाकारला होता. 

 अधिक वाचाः रितेश अन् जेनेलियाच्या 'वेड' सिनेमाने सर्वांना लावलं याड

हे काही पहिलं प्रकरण नाही.. 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील केंद्रांवर पोलिसांनी मारलेले छापे आणि कार्यकर्त्यांना केलेली अटकेचा निषेध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा देऊन त्या संस्थेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. या संबंधीचे व्हीडीयोज त्या वेळी सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी