शिंदे सरकार येताच प्रताप सरनाईकांना लॉटरी, नागला बंदर खाडी किनारा प्रकल्पाला 150 कोटींची मंजुरी

ठाणे
भरत जाधव
Updated Jul 07, 2022 | 15:54 IST

आम्हाला निधी मिळत नव्हता, आमची काम होत नव्हती, अशी टीका करत शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलं होतं.  बंडानंतर यात मार्ग निघेल असा विश्वास अनेक आमदारांना होता, आमदारांचा हा अंदाज खरा ठरू लागला आहे. आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बंडखोर आमदारांच्या कामाला मुहुर्त लागू लागला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केलेल्या नागला बंदर खाडी किनारा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर केला आह

 Lottery to Pratap Saranaik as soon as Shinde government comes
शिंदे सरकार येताच सरनाईकांची अडचण झाली दूर   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा लाभला आहे.
  • नागला बंदर खाडी किनारा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली
  • या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर

ठाणे : आम्हाला निधी मिळत नव्हता, आमची काम होत नव्हती, अशी टीका करत शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलं होतं.  बंडानंतर यात मार्ग निघेल असा विश्वास अनेक आमदारांना होता, आमदारांचा हा अंदाज खरा ठरू लागला आहे. आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बंडखोर आमदारांच्या कामाला मुहुर्त लागू लागला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केलेल्या नागला बंदर खाडी किनारा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर केला आहे.

ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा लाभला आहे. या खाडी किनाऱ्याचा विकास व्हावा, ही काळाची गरज आहे. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने होण्याकरिता खाडी किनाऱ्यांचे सुशोभिकरण करणे गरजेचे असल्याने घोडबंदर रोडवरील नागला बंदर खाडी किनारा विकसित केला जावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे केली होती. अखेर घोडबंदर रोडवरील नागला बंदर हा खाडी किनारा सौंदर्यीकरण करून तेथे आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यासाठी शासनाकडून आराखडा बनविण्यात आला आहे.

Read Also : आमच्याशी बोलायचे असेल तर,... केसरकरांची उद्धव ठाकरेंना अट

पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हा खाडी किनारा सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जवळपास 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात राज्य सरकारने 5 कोटी रुपये टोकन रक्कम म्हणून निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Read Also : जगभरातील पुरुषांची युक्रेनच्या या महिलेला पटवण्याची इच्छा

महाराष्ट्र सरकारच्या "महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास“ या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या कामात प्रकल्प खर्चाचा ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर २५ टक्के हिस्सा महानगरपालिकेचा राहणार आहे. आमदार सरनाईक यांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घोडबंदर रोडवरील नागला बंदर खाडी किनाऱ्यावर जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. 

खाडी किनारा विकसित होत असताना त्यात आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्याचे देखील प्रस्तावित आहे. खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे "आरमार केंद्राची“ प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला, इतिहासप्रेमींना करून दिली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी