NAVI MUMBAI | 20 तोळे सोने पॉलिशसाठी दिले, कारागीर झाला पसार,  दोन वर्षांनंतर आला ताब्यात 

 कल्याण पश्चिम  गांधी चौक परिसरात गोल्ड पॉलिश दुकानातून 20 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या कारागिरला दोन वर्षानंतर बाजारपेठ पोलिसांनी बंगालमधून ताब्यात घेतले आहे.

20 ounces of gold paid for polishing, artisan passed, arrested after two years
NAVI MUMBAI | 20 तोळे सोने पॉलिशसाठी दिले, कारागीर झाला पसार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कल्याण पश्चिम  गांधी चौक परिसरात गोल्ड पॉलिश दुकानातून 20 तोळे सोने घेऊन फरार
  • कारागिरला दोन वर्षानंतर बाजारपेठ पोलिसांनी बंगालमधून ताब्यात घेतले आहे.
  • मिराजउद्दीन शेख अस या चोरट्याचे नाव असून आई आजारी असल्याचे सांगत   दुकानदारांला  10 तोळे चोरीचे सोने विकले होते.

नवी मुंबई :  कल्याण पश्चिम  गांधी चौक परिसरात गोल्ड पॉलिश दुकानातून 20 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या कारागिरला दोन वर्षानंतर बाजारपेठ पोलिसांनी बंगालमधून ताब्यात घेतले आहे मिराजउद्दीन शेख अस या चोरट्याचे नाव असून आई आजारी असल्याचे सांगत   दुकानदारांला  10 तोळे चोरीचे सोने विकले होते. 

कल्याण बाजारपेठ गांधी चौक येथे मुबारक शेख यांचे सोन्याचे दागिने  पॉलिश करून देण्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात मिराजुउद्दीन हा  दागिने पॉलिश करून देण्याचं काम करत होता .23 नोव्हेंबर 2019 रोजी मुबारक यांनी मिरजउद्दीन याला 20 तोळे   सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते 

अचानक एवढे दागिने पाहून मिरजउद्दीनची  नजर फिरली . त्याने हे दागिने घेऊन पळ काढला .याबाबत मुबारक यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती बाजारात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. मिराजउद्दीन हा पसार झाला होता दोन वर्षे पोलिस त्याच्या मागावर होते मात्र मिरजउद्दीन ठिकाण बदलत  पोलिसांना चकवा देत होता. 

अखेर काही दिवसांपूर्वी  पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळाला तो पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील हुबळी जिल्ह्यातील आमग्राम येथे असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचला . मीराजउद्दीन दिसताच बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले  त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 100 ग्रॅम सोने हस्तगत केलं. 

त्यानंतर पोलिसांनी त्याला कल्याण मध्ये आणले पोलीस कोठडी दरम्यान चौकशीअंती त्याने उर्वरित सोनं आई आजारी असल्याचे कारण देऊन दुकानदारांना विकल असल्याची कबुली दिली .पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून विकलेलं 100 ग्राम सोन देखील हस्तगत केलं आहे सोनं कुणाला विकल्याची कबुली दिली पोलिसांनी गुरुवारी 100 ग्राम सोन्याचे किल्ला हस्तगत करण्यात यश मिळवले तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी हे 20 तोळे   सोने हस्तगत केला त्याने दुकानात आई आजारी असल्याचे कारण देऊन दुकानदारांना विकला होता 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी