Fake currency: तुमच्या खिशातील २०० रुपयांची नोट नकली तर नाहीये ना?  पोलिसांनी जप्त केल्या दोन लाखांच्या बनावट नोटा

ठाणे
सुनिल देसले
Updated Jul 27, 2022 | 14:54 IST

Fake currency: पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटांसह आरोपींना कल्याणमधील एका लॉजमधून अटक करण्यात आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र पोलिसांनी नकली नोटांसह एका टोळीचा पर्दाफाश केला आहे 
  • पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक 
  • दोन लाख रुपयांच्या नकली नोटांचा साठा जप्त

Fake currency seized: भारतात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटा जप्त करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा बनावट नोटांचा बाजार रोखण्यासाठी पोलीस नेहमीच कारवाई करत असते आणि आरोपींना गजाआड करत असते. जेणेकरून बनावट नोटा बाजारात येणारच नाहीत आणि सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार नाही. आता महाराष्ट्र पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे, ही टोळी नकली नोटा बाजारात पसरवत होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. ज्यामध्ये दोन रिक्षा चालक सुद्धा आहेत. (200 rupees note in your pocket is it original or fake)

कल्याण बाजारपेठ येथील ही घटना आहे. पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. यासोबतच दोन रिक्षा ड्रायव्हरसह तिघांना अटक केली आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांना मिळालेल्या गुप्त महिन्याच्या आधारावर छापेमारी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटकेची कारवाई केली आहे.

दिल्लीहून आणल्या होत्या बनावट नोटा

महात्मा फुले पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद आरिफ, सूरत पुजारी आणि करण रजक अशी आहेत. या तिन्ही आरोपींना कल्याणमधील एका लॉजमधून अटक करण्यात आली आहे

अधिक वाचा : ITR filing : नोकरदारांनी आणि ITR-1 द्वारे प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांनी तयार ठेवावे हे 9 दस्तावेज...पाहा चेकलिस्ट

पोलिसांना माहिती मिळाली होती की, तिन्ही आरोपी दिल्लीहून मुंबईत बनावट नोटा घेऊन आले होते. हे आरोपी दुकानदारांना आणि लहान व्यापाऱ्यांकडून काही सामान खरेदी करण्याची योजना आखत होते आणि त्यानंतर आपल्याकडी बनावट नोटा बाजारात वितरीत करत असतं.

लॉजमध्ये लपले होते आरोपी

महात्मा फुले पोलिसांना प्राथमिक तपासात असं आढळून आलं की, आरोपींनी २०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्लीहून आणल्या होत्या. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने सांगितले की, आमचे एपीआय दीपक सरोदे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, कल्याणमधील अनिल पॅलेज लॉजमध्ये आरोपी लपून बसले आहेत. ही माहिती मिळाल्यावर आम्ही सापळा रचून छापेमारी केली आणि ही कारवाई केली. बनावट नोटांसह आरोपींना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी