मध्यरेल्वेचा ठाण्यात 2 जानेवारीला ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक

ठाणे
भरत जाधव
Updated Dec 30, 2021 | 13:18 IST

पाचव्या सहाव्या मार्गिगेसाठी 24 तासांचा मेगा ब्लॉक (mega block ) घेण्यात येत आहे. हा मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण मार्गावर असून धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेला एकही लोकल (Local train) धावणार नाही.

mega block
ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL

ठाणे :  पाचव्या सहाव्या मार्गिगेसाठी 24 तासांचा मेगा ब्लॉक (mega block ) घेण्यात येत आहे. हा मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण मार्गावर असून धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेला एकही लोकल (Local train) धावणार नाही. यादरम्यान 200 लोकलच्या फेऱ्या राहणार रद्द, तर शनिवार, रविवार आणि सोमवारी मिळून 18 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

शनिवारी मध्यरात्री नंतर 2 वाजता हा मेगाब्लॉक सुरू होईल तर रविवारी रात्री 2 वाजता तो संपेल, सोमवारी सकाळी सर्व गाड्या सुरू होतील ब्लॉक नंतर कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन बांधलेल्या खाडी पुलावरून धीम्या लोकल धावतील. ब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर एकही लोकल उपलब्ध नसेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी