कुर्लाहुन नेहमी लोकलचा प्रवास, अन् डोंबिवलीत करायच्या घरफोड्या ३ बहिणींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाणे
भरत जाधव
Updated Jun 12, 2022 | 13:18 IST

इमारतीमधील (Buildings) रिकामे घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप (Lock) उघडून घरफोडी (Burglary) करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण गु्न्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सारिका सकट, मिणा इंगळे, सुजाता सकट असं या तिन्ही बहिणींचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणींना अटक करण्यात आली आहे.

3 sisters who were burglarized in dombivali
लोकलनं प्रवास करत ३ बहिणी डोंबिवलीत करायच्या चोऱ्या   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • चोरी केल्यानंतर जेजुरीला गेल्या तिन्ही बहिणी
  • सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तिन्ही चोर बहिणींना पोलिसांनी अटक केली.
  • आरोपींविरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

कल्याण :  इमारतीमधील (Buildings) रिकामे घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप (Lock) उघडून घरफोडी (Burglary) करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण गु्न्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सारिका सकट, मिणा इंगळे, सुजाता सकट असं या तिन्ही बहिणींचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणींना अटक करण्यात आली आहे. डोंबिवली येथे एका घरात चोरी केल्यानंतर या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणींना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या तिघींनी आजमितीला किती ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डोंबिवली पूर्व रामनगर परिसरात एका इमारतीमधील बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत बनावट चावीने दरवाजा उघडून घरातील २३ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरी करणाऱ्या तीन महिला कैद झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.

कल्याण गुन्हे शाखेने डोंबिवली स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना या महिला स्टेशनहून ट्रेनने मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पुढे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता घाटकोपर येथे महिला उतरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. या तिन्ही महिला मानखुर्द, कुर्ला परिसरातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फत कल्याण क्राईमचे पोलीस कर्मचारी विनोद चन्ने यांना मिळाली. त्यानंतर कल्याण क्राइम ब्रँचने या तिन्ही महिलांचा शोध घेणं सुरू केलं. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना या तिन्ही महिला सहकुटुंब जेजुरी येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तत्काळ जेजुरी येथे सापळा रचत या तिन्ही महिलांना जेजुरी येथून अटक केली आहे. पोलिसांनी महिलांकडून चोरीचे २३ तोळे सोन्याचे  दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या तिन्ही सराईत चोरट्या असून कुर्ला परिसरामध्ये राहतात व चोरी करण्यासाठी ट्रेनचा प्रवास करत डोंबिवलीमध्ये यायचे व विविध कारणे देत इमारतीमध्ये प्रवेश करायच्या. बनवाट चावीने घराचे कूलूप उघडून बंद घरांमध्ये चोरी करायचे.  या तिन्ही महिला आरोपींनी डोंबिवलीमध्ये अशाप्रकारे किती ठिकाणी चोरी केली याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींविरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी