boy attacked by stray dogs : ४ वर्षांच्या मुलावर ३ भटक्या कुत्र्यांचा हल्ला

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Jan 02, 2022 | 22:55 IST

4 year old boy attacked by 3 stray dogs in Kalyan Dwarali Village : ४ वर्षांच्या मुलावर ३ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना कल्याण पूर्वेच्या द्वारली गावात घडली.

4 year old boy attacked by 3 stray dogs in Kalyan Dwarali Village
४ वर्षांच्या मुलावर ३ भटक्या कुत्र्यांचा हल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ४ वर्षांच्या मुलावर ३ भटक्या कुत्र्यांचा हल्ला
  • कल्याण पूर्वेच्या द्वारली गावातील घटना
  • मुलावर कळव्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

4 year old boy attacked by 3 stray dogs in Kalyan Dwarali Village : कल्याण : ४ वर्षांच्या मुलावर ३ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना कल्याण पूर्वेच्या द्वारली गावात घडली. स्थानिकांनी कसेबसे कुत्र्यांना पळवून लावले. मुलाला लगेच डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात नेण्यात आले. तिथून कळव्याच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मुलावर उपचार सुरू आहेत.

डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर नव्हते आणि औषधे उपलब्ध नव्हती. यामुळेच मुलाला गंभीर स्थितीत कळव्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले; असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी केला. यामुळे शास्त्री नगर रुग्णालयाच्या कारभाराविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. तर कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्री नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. नऊ महिन्यांत ९ हजार ४४ जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. दरमहा सुमारे एक हजार नागरिकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडत आहेत. कुत्र्यांची दहशत वाढत आहे. 

द्वारलीतील सुहास निंबोरे आदित्य अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा मुलगा इमारतीच्या आवारात खेळत होता, त्यावेळी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांना बघून घाबरलेल्या मुलाने आरडाओरडा केला. स्थानिकांनी कुत्र्यांना पळवून लावले. तोपर्यंत कुत्र्यांनी मुलाला अठरा ठिकाणी चावा घेतला होता. धावपळ करुन मुलाला कळव्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तो लवकर बरा होईल. पण केडीएमसीने कुत्र्यांचा प्रश्न वैद्यकीय सेवांचा गोंधळ या दोन्ही प्रश्नांवर लवकर उत्तर शोधावे; अशी मागणी नागरिक करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी