Hit and Run : ठाण्यात हिट अँड रन, महिलेच्या कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, आरोपी महिला फरार

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Sep 23, 2022 | 08:39 IST

Hit and Run : ठाण्यात एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेच्या कारच्या धडकेत एक १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर महिलेने घटनास्थळाहून पळ काढला आहे. असे असले तरी अद्याप आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही. 

hit and run at thane
महिलेच्या कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ठाण्यात एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे.
  • एका ४० वर्षीय महिलेच्या कारच्या धडकेत एक १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे.
  • या अपघातानंतर महिलेने घटनास्थळाहून पळ काढला आहे.

Hit and Run :ठाणे : ठाण्यात एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेच्या कारच्या धडकेत एक १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर महिलेने घटनास्थळाहून पळ काढला आहे. असे असले तरी अद्याप आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही. (40 year old women ran car on 19 year old delivery boy in thane accused run from spot)

अधिक वाचा :  Narayan Rane: 'उद्धव ठाकरे जगातला 'ढ' माणूस, आता संजय राऊतच्यासोबत हा पण जेलमध्ये जाणार,' राणेंची जहरी टीका


मिळालेल्या माहितीनुसार अजय ढोकणे हा १९ वर्षीय तरुण ठाण्यातील हिरानंदनी भागात एका किराणा मालाच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अजय मूळचा परभणीचा असून तो घोडबंदर येथील पाटीलपाडा इथे आपल्या आई वडिलांसोबत राहत होता.  गुरूवारी अजय आपल्या स्कूटीवर काही सामान डिलिव्हरी करण्यासाठी बाहेर पडला होता. तेव्हा पुढे एक महिला आपल्या वॅगन आर या गाडीतून प्रवास करत होती. या महिलेने गाडी चालवताना ब्रेक दाबण्याऐवजी क्लच दाबला आणि त्यामुळे जोरात अपघात झाला. या अपघातात अजय गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

अधिक वाचा : Crime : पुण्यात 13 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ...शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल

हिरानंदनी फाऊंडेशन स्कूलच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये महिला गाडी चालवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या महिलेची ओळख पटली नसून पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजय हा घरातला कमवाता मुलगा होता. त्याच्या जाण्याने आई वडिलांना धक्का बसला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपी महिलेला अटक करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

अधिक वाचा :  Devendra Fadnavis: 'तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला', फडणवीसांचा थेट आरोप..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी