Mumbai News: 'देव तारी त्याला कोण मारी, पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला प्रवाशाचा जीव 

ठाणे
Updated May 12, 2022 | 14:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Railway Police | देव तारी त्याला कोण मारी हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. दरम्यान याचाच एक प्रत्यय ठाण्यातील रेल्वे स्थानकावर आला आहे.

A police constable risked his life to save the life of a passenger
दैव बलवत्तर म्हणून वाचला प्रवाशाचा जीव, पाहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला प्रवाशाचा जीव.
  • ठाणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद.
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Railway Police | ठाणे : देव तारी त्याला कोण मारी हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. दरम्यान याचाच एक प्रत्यय ठाण्यातील रेल्वे स्थानकावर आला आहे. कारण इथे रेल्वे कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाणे स्थानकात प्रवासी रेल्वेचा ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला दरम्यान तिथे असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने त्याचा जीव वाचवला. (A police constable risked his life to save the life of a passenger). 

अधिक वाचा : कचरा वाटणाऱ्या बुटांची किंमत आहे ४८ हजार

संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद 

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याचा राग अनावर झाल्याचेही पाहायला मिळत आहे. कारण प्रवासी समोरून ट्रेन असताना देखील ट्रॅक ओलांडत होता त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली. 

लक्षणीय बाब म्हणजे तो प्रवासी रुळ ओलांडत असताना तो लोकल ट्रेनच्या धडकेत येणारच होता तेवढ्यात तिथे ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढले आणि त्याचा जीव वाचवला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी