डहाणूमधील आदिवासींच्या सर्वसमावेषकतेच्या दिशेने पाऊल

पशुधन दान तसेच इतर विकासात्मक उपक्रमांचा डहाणूमधील १,१०० हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. अदानीइलेक्ट्रिसिटी आणि अदानीफाउंडेशन यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या कार्याचे हे फलित आहे.

A step towards inclusiveness of tribals in Dahanu
डहाणूमधील आदिवासींच्या सर्वसमावेषकतेच्या दिशेने पाऊल 
थोडं पण कामाचं
  • सक्षम उपजीविकेसह स्वप्नांना मिळाले पंख
  • पशुधन दान तसेच इतर विकासात्मक उपक्रमांचा डहाणूमधील १,१०० हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना लाभ झाला आहे.
  • अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाउंडेशन यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या कार्याचे हे फलित आहे.

डहाणू :  पशुधन दान तसेच इतर विकासात्मक उपक्रमांचा डहाणूमधील १,१०० हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. अदानीइलेक्ट्रिसिटी आणि अदानीफाउंडेशन यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या कार्याचे हे फलित आहे. (A step towards inclusiveness of tribals in Dahanu)


महाराष्ट्रातील सरावली या गावातील वीरेंद्र पटेल हा एक सामान्य शेतकरी. आपल्या प्रियजनांच्या समाधानी चेह-यामुळे त्याला आनंद मिळतो खरा. मात्र रात्रंदिवस कष्ट करूनही त्याचे तुटपुंजे उत्पन्न हे त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हते. त्याच्या काहीशा मितभाषी स्वभावामुळे शहरात जाण्याचे त्याचे आकर्षण कमी झाले असले तरी शहराप्रमाणे अतिरिक्त उत्पन्नाची संधी गवसण्याचे त्याचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नाही. त्याच्या अशा या आर्थिक स्थितीबद्दल कळताच एका स्थानिक सामाजिक गटाने त्याच्याशी संपर्क साधला. गटातील कार्यकर्त्यांनी त्याच्या शेतासाठी जेव्हा पशु-गुरे वगैरे देत साहाय्य केले तेव्हा वीरेंद्रचा चेहराच उजळला. आपली इच्छा पूर्ण झाल्याची कृतज्ञता आता त्याच्या चेह-यावर लख्ख दिसते.


पटेल म्हणतात, “आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत मला दान देण्यात आलेली गुरे-ढोरे ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत लाभदायी ठरली आहेत. त्यामुळे शेतीचे अनेक काम मी तत्परतेने करू शकलो.” पटेल सांगतात, “या गुरांपासून (गायी) मिळणा-या दुधामुळे मला माझ्या कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा एक मार्ग मिळाला आहे. माझ्या कुटुंबाला अशारितीने आर्थिक मदत करण्यास सक्षम केल्याबद्दल मी अदानीइलेक्ट्रिसिटी आणि अदानीफाउंडेशनचा खरोखर मनापासून आभारी आहे.”


वीरेंद्र यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील पालघरमधील डहाणू या किनारपट्टीतील अनेक आदिवासी शेतकरी हे शाश्वत उपजीविकेसाठी भरवशाच्या उत्पन्नाच्या स्रोतांचा शोध घेत आहेत. परिसरात डहाणू आष्णिक ऊर्जा प्रकल्प चालविणा-या अदानीइलेक्ट्रिसिटीने स्थानिक शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा ओळखल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत याबाबत अथकपणे कार्य केले आहे.


अदानीफाउंडेशन ही अदानीसमुहाची एक सेवाभावी संस्था असून डहाणू नजीकच्या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि परस्पर संबंध जोपासण्यासाठी साहाय्य करण्यासाठी या आदिवासी समुदायांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्याचा स्थानिक गावक-यांना उपजिविकेच्या दृष्टिने लाभ झाला आहे.


एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत अदाणीच्या डहाणू आष्णिक ऊर्जा केंद्राने (ADTPS) आदिवासी शेतकऱ्यांकरिता गुरे दान करण्यासाठी अलीकडेच पुढाकार घेतला. हा उपक्रम सुरू झाल्यापासून – अल्पाधीत सुमारे १,१०० आदिवासी शेतकरी आणि अनेक कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे.
“आम्ही नेहमीच समाजासोबत एक भक्कम सह-अस्तित्व निर्माण करण्याच्या दिशेने कार्य केले आहे आणि अधिकाधिक कुटुंबांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरे दान केल्याने अशा आदिवासींना शाश्वत उपजीविका करण्यास आणि हंगामी स्थलांतरास प्रतिबंध होण्यास मदतच ठरेल”, असे एडीटीपीएसचा प्रवक्ता म्हणतो. "उत्तमतेसह वृद्धी - हे समूहाचे केवळ ब्रीदच नाही तर कोणताही नवीन उपक्रम हाती घेताना आम्ही त्यावर दृढ विश्वास ठेवला आहे", असेही प्रवक्त्याने नमूद केले.


पशुदान उपक्रमते अंतर्गत ८ आदिवासी शेतकर्‍यांना एकूण १२ गाय आणि १० बैल देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य होईल. कमी कालावधीत अधिक दूध विकण्यापासून ते शेतीविषयक काम पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत ही गुरे उपयुक्त ठरतील.  अदानीफाऊंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) सारख्या उपक्रमांचा डहाणू आणि आसपासच्या भागातील आदिवासींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे पाहून आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. “शेतकऱ्यांना अधिक शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी आणि मोठ्या गावांमध्ये तसेच शहरांमध्ये शेतकरी-आदिवासींचे स्थलांतर रोखण्याच्या दिशेने हा उपक्रम म्हणजे त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे”, असेही प्रवक्ता म्हणाला.


डहाणू तालुक्यात आदिवासींची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि येथे स्थायिक झालेल्या आदिवासी समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी अदानीफाउंडेशन आणि अदानीइलेक्ट्रिसिटी एकत्रितरित्या कार्य करत आहे.


शेतकऱ्यांना फळबाग विकसित करण्यास सक्षम करण्यापासून ते तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन देणारे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यापर्यंत या अंतर्गत साहाय्य केले जाते. अशा या शाश्वत विकास उपक्रमामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे स्थलांतर रोखण्यास यश आले असून अनेकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.


अदानीफाऊंडेशन ही देशातील २,४०९ गावे आणि शहरांमध्ये सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास प्रकल्पांद्वारे राष्ट्र उभारणीत गेल्या अनेक सलग वर्षांपासून योगदान देत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी