बापरे! 'एक्सप्रेस वे'वर अपघात

ठाणे
रोहन जुवेकर
Updated May 04, 2022 | 13:03 IST

accident at khopoli exit on mumbai pune expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज  (बुधवार ४ मे २०२२) अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर खंडाळा पुलावरून खोपोली एक्झिटच्या उतारावर उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

accident at khopoli exit on mumbai pune expressway
बापरे! 'एक्सप्रेस वे'वर अपघात 
थोडं पण कामाचं
  • बापरे! 'एक्सप्रेस वे'वर अपघात
  • खोपोली एक्झिटच्या उतारावर अपघात
  • कंटेनर उलटला

accident at khopoli exit on mumbai pune expressway : खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज  (बुधवार ४ मे २०२२) अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर खंडाळा पुलावरून खोपोली एक्झिटच्या उतारावर उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. 

कंटेनर पुलाच्या उतारावरून उलटून खाली पडला. कंटेनर कोसळल्याचा आवाज येताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या दोन जणांना पोलिसांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. वेळेत उपचार झाल्यामुळे जखमींची प्रकृती स्थिर आहे. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी