THANE: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनताच, ठाणेकरांची कामं पटापट सुरु

ठाणे
रोहित गोळे
Updated Jul 27, 2022 | 00:21 IST

Eknath Shinde became CM Thanekars work started rapidly: एक ठाणेकर मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच ठाणेकरांची कामं अतिशय वेगाने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जाणून घ्या याचविषयी सविस्तरपणे.

after kopri wagle estates diva city will also get increased water supply as soon as eknath shinde became cm thanekars work started rapidly
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनताच, ठाणेकरांची कामं पटापट सुरु 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणेकरांच्या कामाला दिलं प्राधान्य
  • कोपरी आणि वागळेपाठोपाठ दिव्यात वाढीव पाणी पुरवठा सुरु
  • मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसात ठाणेकरांसाठी वाढीव पाणी पुरवठा

Thane Water Supply: ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कारभार हाती घेताच ठाणेकरांची कामं अगदी पटापट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून नवीन जोडणी घेत ठाण्यातील (Thane) कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट भागाला २० दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. ज्यानंतर अगदी काही दिवसातच त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी देखील झाली आहे. पण ठाणेकरांनी (Thanekars) मात्र आनंद व्यक्त केला आहे. (after kopri wagle estates diva city will also get increased water supply as soon as eknath shinde became cm thanekars work started rapidly)

ठाण्यापाठोपाठच आता गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या दिव्याच्या नागरिकांना साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी देण्यात आले आहे. यामुळे दिव्यातील पाणी टंचाईची समस्या सुटेल, असा दावा पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहेत.

अधिक वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिली 'या' ठिकाणी भेट

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरीकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. संपूर्ण शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे. 

ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाच, मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा: 'उद्धव ठाकरेंसारखा खोटरडा, कपटी माणूस', राणेंची जहरी टीका

यामुळे ठाणे शहराला एकूण १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यात किसननगर, भटवाडी भागाला ४ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट येथीस इंदिरानगर संप हाऊसवरून पाणी पुरवठा होणाऱ्या भागांना १० दशलक्षलीटर आणि कोपरी, आनंदनगर भागाला ६ दशलक्षलीटर असे वाढीव पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

त्यापाठोपाठ एमआयडीसीने दिवा भागात साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध करून दिले असून त्याचा शुभारंभ मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा: भाजपला शिवसेना संपवायची आहे -उद्धव ठाकरे

दिवा भागातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त होते. ही समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शहराला १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी दिले असून त्यातील साडे सहा दशलक्षलीटर इतके पाणी दिव्याला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाणी टंचाईची समस्या आता सुटेल, अशी प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी