ठाणे : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड केल्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षात आता दोन गट पडले असून आमदारांपाठोपाठ आता स्थानिक स्वराज संस्थेमधील पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत आहे. शिवसेनेचा मुंबई आणि परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, आता ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीनंतर आता उल्हासनगरमधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे.(After Thane, NaviMumbai, now push Shiv Sena in Ulhasnagar !, More than 15 corporators support Shinde group)
अधिक वाचा : Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे अडीच हजार रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू
शिवसेना पक्षाला मागील काही दिवसांपासून दररोज एकनाथ शिंदे गट धक्क्यांवर धक्के देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या ६६ नगरसेवक. कल्याण डोंबिवली महापालिकेतील ५५ नगरसेवकांनी व नवी मुंबई मुंबईतील ३२ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.
आता उल्हासनगरमधील १५ नगरसेवकांनी ठाकरे यांच्या जागी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातातून महानगरपालिका एकामागून एक निसटत आहे. यातील नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि आता उल्हासनगर या चार महानगरपालिका पूर्णपणे शिवसेनेच्या हातातून गेल्या आहेत.
अधिक वाचा : Mumbai Crime: 10 वर्षांनी लहान प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली, सकाळ होताच बेडवर आढळला मृतदेह
मुंबईनंतर ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्येही शिवसेनेची पकड असल्याने या पाठिंब्याला महत्त्व कमी लेखता येणार नाही. याशिवाय नाशिक, दिंडोरी येथील काही नगरसेवकांनी देखील पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील इतर महानगपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी शिंदे गटासोबत येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, बहुतांश महानगरपालिका आणि नगरपालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. लवकरच निवडणुका होणार आहेत पण एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक एकनाथ शिंदे गटात येत असल्याने शिंदे गटाचा फायदा होईल आणि ठाकरे गटाचे नुकसान होत आहे.