मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजप नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2022 | 20:39 IST

Attack On BJP Corporator In Bhiwandi City, CCTV Video Viral, CCTV Footage Viral, Case Filed In Police Station : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात भाजपचे नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

Attack On BJP Corporator In Bhiwandi City
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजप नगरसेवकावर प्राणघातक हल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजप नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
  • घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बघून पोलिसांनी तपास सुरू केला
  • पक्षांतर्गत वादातून हल्ला झाल्याचा संशय

Attack On BJP Corporator In Bhiwandi City, CCTV Video Viral, CCTV Footage Viral, Case Filed In Police Station : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात भाजपचे नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बघून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमी झालेले नगरसेवक नित्यानंद नाडर आणि घटना बघणारे प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बोलून आणखी माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भिवंडीच्या लाहोटी कंपाऊंड परिसरामध्ये भाजपचे नगरसेवक नित्यानंद नाडर हे आपल्या कार्यालयातून बाहेर पडत होते. त्याचवेळी १० पेक्षा जास्त नागरिकांनी त्यांच्या कारला घेराव घातला. लाठ्याकाठ्या तसेच इतर वस्तूंचा वापर करून नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नित्यानंद नाडर गंभीर जखमी झाले. 

Play For Kid : ठाण्यात छडी लागे छम छम नाटकाचा रंगला प्रयोग

पोलिसच करायचे अमली पदार्थाची तस्करी, 2 लाखांच्या मुद्देमालासह दोन कर्मचारी अटकेत

पक्षांतर्गत वादातून हल्ला झाल्याचा संशय नगरसेवक नित्यानंद नाडर यांनी व्यक्त केला आहे. पोलीस तपास सुरू आहे. 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या युतीचे सरकार आहे. घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. भाजपच्या जखमी नगरसेवकाने पक्षातल्या सहकाऱ्यांविषयी संशय व्यक्त केला आहे. या परिस्थितीत काय कारवाई होते याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी