कल्याण : झटपट श्रीमंत होण्यासाठी 19 वर्षीय अकाउंट तरुणाने घरातच छापल्या बनावट नोटा आणि त्याचं चलनात आणण्यासाठी आपल्या दोन साथीदाराना कल्याण स्टेशन परिसरात दुकानदारांकडून सुट्टे मागत नोटा चलनात आणणाऱ्या तीन तरुणांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग डयुटी करीत असलेल्या पोलिसांना एस टी.स्टॅण्डच्या इनगेटवर काही तरुण भारतीय बनावट चलनी नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीसांनी रात्रौ 10 च्या सुमार सदर ठिकाणी सापळा रचून रजनेश चौधरी, हर्षद नौशद खान, अर्जुन कुशवह यांना ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्यांच्या कडून भारतीय चलनातील 50 , 100 , 200 रूपये दराच्या एकुण 25,000 रुपयांचे बनावट नोटा मिळून आल्याने पोलीस या तिघांची चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान पोलिसांना समजले की मुख्य आरोपी रजनेश चौधरी एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यापासून झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने आपल्या घरी एक प्रिंटर आणि नोट बनवण्यासाठी लागणारा पेपर त्याच बरोबर नोटेवर असलेले विविध रंग घरात आणून त्याने पन्नास शंभर दोनशे आणि पाचशेच्या नोटा छापल्या होत्या.
पण या नोटा चलनात कसे आणाव्यात यासाठी त्यांनी आपल्या दोन मित्रांना टक्केवारी ठरवत स्टेशन परिसरात असलेल्या रिक्षा चालक पान टपरी चालक व छोटे-मोठे व्यापारीना या बनावट नोटा देत त्याच्याकडे सुट्टे मागून भारतीय चलनातील खऱ्या नोटा घेत या बनावट नोटा चलनामध्ये आणत होतो, अशी माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलिसांनी या तिघांना वेड्या ठोकत या तिघांकडून बनावट नोटा व त्या बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले करून पुढील तपास सुरू केला आहे