मोठी बातमी ! रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली 

ठाणे
सुनिल देसले
Updated Apr 01, 2023 | 15:13 IST

Suspicious boat found near Mumbai: समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

big breaking Suspicious boat found near palghar mumbai coast live updates read in marathi
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली
  • बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती
  • बोटवर असलेल्या नागरिकांची चौकशी सुरू

big breaking Suspicious boat found near palghar coast: एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईपासून काही अंतरावर आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट आढळली आहे. संशयास्पद बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बोटवर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचं बोललं जात आहे. संशयास्पद बोट आढळून आल्याची माहिती मिळताच नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही बोट नौदलाच्या हद्दीत आढळून आली. त्यानंतर तात्काळ नौदल आणि तटरक्षक दलाने तपास सुरू केला.

हे पण वाचा : दररोजच्या या सवयींमुळे गळतात केस

ही बोट समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मैल अंतरावर तर मुंबईच्या समुद्रात असलेल्या ओएनजीसी प्लॅटफॉर्मसमोर 43 नॉटिकल अंतरावर ही बोट आढळून आली आहे. ही बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असल्याची माहिती समोर येत आहे.

हे पण वाचा : जेवताना पाणी प्यावे की नाही? तुम्ही काय करता?

ऑगस्ट महिन्यात सुद्धा आढळली होती बोट

यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर श्रीवर्धन किनाऱ्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली होती. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स आणि  दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

बोटीचे नाव ‘लेडीहान’ असे होते. तिची मालकी ऑस्टेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची होती, तिचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका कोरिअन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने ‘लेडीहान’ या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी